मुखेड फाट्यावर सर्कलची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 06:57 PM2020-12-16T18:57:23+5:302020-12-17T00:47:48+5:30

पिंपळगाव बसवंत : पिंपळगाव शहरातून जाणाऱ्या शिर्डी- सुरत महामार्गाचे गेल्या दोन तीन वर्षांपासून कासव गतिने काम सुरू असल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे. सदर काम जलद गतीने पूर्ण करून त्या ठिकाणी सर्कल उभारावे, अशी मागणी आदिवासी उलगुलान सेनेने बांधकाम विभाग नाशिकचे अभियंता पाटील, पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पटारे व ग्रामपंचायतचे गणेश बनकर यांना निवेदनाद्वारे केली आहे.

Demand for a circle on the mouthpiece | मुखेड फाट्यावर सर्कलची मागणी

मुखेड फाट्यावर सर्कलची मागणी

Next
ठळक मुद्देअपघातात वाढ : आदिवासी उलगुलान सेनेचे निवेदन

निवेदनात म्हटले आहे की, आदिवासी उलगुलान सेनेतर्फे अपघाताचे गांभीर्य लक्षात आणून देत मुखेड फाट्यावर सर्कल बांधून रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी ठेकेदार व संबंधित विभागाला केली; मात्र त्याकडे दुर्लक्ष केल्याने अपघात होऊन निष्पाप लोकांचे बळी जात आहेत. लवकरात लवकर सदर काम पूर्ण करून दिलासा द्यावा, अन्यथा जनआंदोलन छेडण्याचा इशारा आदिवासी उलगुलान सेनेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर फसाळे यांनी दिला आहे. यावेळी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष दत्तात्रेय झनकर, भागवत घागरे, ग्रामपंचायत माजी सदस्य विष्णू गांगुर्डे, शाखा अध्यक्ष रमेश गवळी, संदीप जाधव, भाऊसाहेब पिठे, जितू वाघ, मनोज पवार, श्याम कोकाटे, मनोज कराटे, आकाश मोरे आदी उपस्थित होते.
बांधकाम विभाग, पोलीस प्रशासन व स्थानिक ग्रामपंचायत यांना वारंवार निवेदन देऊनही अद्यापही मुखेड फाट्यावरील सर्कलविषयी कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. तेथील वस्तीच्या ठिकाणच्या रस्त्याचे कामदेखील अपूर्ण आहे. ते लवकरात लवकर पूर्ण करावे.
- प्रभाकर फसाळे, संस्थापक, आदिवासी उलगुलान सेना

Web Title: Demand for a circle on the mouthpiece

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.