वडाळा-पाथर्डी रस्त्यावरील अवजड वाहतूक बंद करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 04:11 AM2021-06-20T04:11:40+5:302021-06-20T04:11:40+5:30
वडाळा नाका ते पाथर्डी गाव या रस्त्यावर विनयनगर, इंदिरानगर, साईनाथनगर, कलानगर ,पांडवनगरी, शरयूनगर यासह विविध उपनगरे आहेत. तसेच ...
वडाळा नाका ते पाथर्डी गाव या रस्त्यावर विनयनगर, इंदिरानगर, साईनाथनगर, कलानगर ,पांडवनगरी, शरयूनगर यासह विविध उपनगरे आहेत. तसेच अंबड औद्योगिक वसाहतीत जाण्यासाठी जवळचा मार्ग असल्याने दिवसभर वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ सुरू असते. या रस्त्यालगतच प्राथमिक, माध्यमिक शाळा व महाविद्यालये असल्याने दिवसभर विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी शाळा व महाविद्यालयात ये-जा करीत असतात. परंतु या कोणत्याही गोष्टीचा गांभीर्याने विचार न करता लोकवस्तीतून सुमारे एक वर्षापासून द्वारका चौकातून निर्बंध घालण्यात आलेले मालट्रक, ट्रेलर, कंटेनर, टॅंकरची वाहतूक वडाळा गाव, कलानगर चौक, वडाळा-पाथर्डी रस्त्यावरून वळविण्यात आली आहे. त्यामुळे पादचारी व वाहनधारकांना रस्त्यावरून मार्गक्रमण करणे जिकिरीचे झाले आहे. वडाळा-पाथर्डी रस्त्यावरून अवजड वाहनांची वाहतूक बंद करावी. अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
यावेळी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहराध्यक्ष गौरव गोवर्धने, शहर उपाध्यक्ष रमीज पठाण, प्रदेश सरचिटणीस अमोल पाटील, शहर चिटणीस संकेत गायकवाड उपस्थित हाेतेे.