अवजड वाहनांची वाहतूक बंद करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2020 11:30 PM2020-08-12T23:30:59+5:302020-08-12T23:55:36+5:30
इंदिरानगर : द्वारका चौकातून अवजड वाहनांची ये-जा बंद करून पुणे महामार्गाकडून येणारी अवजड वाहने वडाळा गाव व वडाळा-पाथर्डी रस्त्याने वळवण्यात आल्याने या मार्गाचा वापर करणाऱ्या कामगार वर्ग व नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. दुर्घटना होऊन जीवितहानीची वाट न बघता तातडीने अवजड वाहनांची वाहतूक बंद करावी, अशी मागणी नगरसेवक अॅड. श्याम बडोदे यांनी पोलीस उपआयुक्त विजय खरात यांच्याकडे केली आहे.

महापालिकेने लाखो रु पये खर्च करून नागपूरच्या धर्तीवर वडाळा नाका ते पाथर्डी गाव असा दोन टप्प्यात रस्ता तयार केला. या रस्त्याचे रु ंदीकरण आणि डांबरीकरण करण्यात आल्याने परिसरातील सौंदर्यात भर पडली आहे. या रस्त्यावर विनयनगर, इंदिरानगर, साईनाथनगर, कलानगर, पांडवनगरी, शरयू नगर ,समर्थ नगरसह विविध उपनगरे आहेत. अंबड औद्योगिक वसाहतीकडे जाण्यासाठी जवळचा मार्ग असल्याने कामगार वर्गाची दिवसभर मोठ्या प्रमाणात वर्दळ सुरू असते. तसेच रस्त्यालगत प्राथमिक, माध्यमिक व महाविद्यालये असल्याने दिवसभर शेकडोच्या संख्येने विद्यार्थ्यांची गर्दी असते. या कोणत्याही गोष्टींचा गांभीर्याने विचार न करता लोकवस्तीतून सुमारे तीन महिन्यांपासून द्वारका चौकातून निर्बंध घालण्यात आलेले मालट्रक, ट्रेलर, कंटेनर, टॅँकरची वाहतूक वडाळा गाव ते वडाळा-पाथर्डी रस्त्यावरून वळविण्यात आली आहे.