नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई देण्याची मागणीु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2020 09:09 PM2020-07-20T21:09:28+5:302020-07-21T01:56:14+5:30
पेठ : तालुक्यात जवळपास एक महिन्यापासून पावसाने उघडीप दिल्याने खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून शासनाने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी पेठ तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने तहसीलदार संदिप भोसले यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
पेठ : तालुक्यात जवळपास एक महिन्यापासून पावसाने उघडीप दिल्याने खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून शासनाने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी पेठ तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने तहसीलदार संदिप भोसले यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. ऐन लावणीच्या वेळी पाऊस गायब झाल्याने भात व नागालीची रोपे वाया गेली आहेत. पावसाच्या भरवशावर शेतकऱ्यांनी लावणी केली मात्र नंतर पाऊस आला नसल्याने रोपे वाळून गेल्याने प्रशासनाने पंचनामे करून नुकसान भरपाईचे प्रस्ताव सादर करावेत अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
-------------------------
याशिवाय पर्जन्यमापक यंत्राची दुरु स्ती करून अचूक पर्जन्य आकडेवारी सादर करावी, पिक आणेवारी कमी करावी, खावटी कर्ज व पिककर्ज वाटप करावे आदी मागण्यांचा निवेदनात समावेश आहे. याप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष संजय वाघ, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष विजय देशमुख, उपाध्यक्ष छगन चारोस्कर ,
छबीलदास चोरटे, शहराध्यक्ष त्र्यंबक कांमडी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थीत होते.