शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2020 04:13 AM2020-12-06T04:13:32+5:302020-12-06T04:13:32+5:30
अलंगुण : सुरगाणा तालुक्यात परतीच्या पावसाने हातातोंडाशी आलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, त्याची भरपाई मिळावी अशी मागणी ...
अलंगुण : सुरगाणा तालुक्यात परतीच्या पावसाने हातातोंडाशी आलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, त्याची भरपाई मिळावी अशी मागणी किसान सभेच्या वतीने नायब तहसीलदार रावसाहेब बकरे यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
निवेदनात म्हटले आहे, परतीच्या पावसाने तालुक्यातील शेतकर्यांचे भात, नागली, वरई या प्रमुख पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे झाले; मात्र शासनामार्फत जाहीर करण्यात आलेली नुकसानभरपाई अद्याप मिळाली नसल्याने आधीच कोविड-१९ने प्रभावित झालेला बळीराजा दुहेरी संकटात सापडून आर्थिक मेटाकुटीला आला आहे. गोरगरीब शेतकऱ्यांची व्यथा लक्षात घेऊन शासनाने जाहीर केलेली नुकसानभरपाई तातडीने देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
निवेदनावर तालुका किसान सभेचे अध्यक्ष रामजी गावीत, सेक्रेटरी भिका राठोड, पंचायत समिती सभापती मनीषा महाले, उपसभापती इंद्रजित गावीत, पंचायत समिती सदस्य विजय घंगळे, माजी सदस्य संजय पवार, देवीदास देशमुख, सरपंच कॉम्रेड भारती चौधरी, उपसरपंच संतूभाई पालवा आदींच्या सह्या आहेत.
फोटो : ०५ किसान सभा
नायब तहसीलदार बकरे यांना निवेदन देताना किसान सभेचे तालुकाध्यक्ष रामजी गावीत, सेक्रेटरी भिका राठोड, सभापती मनीषा महाले, उपसभापती इंद्रजित गावीत आदींसह कार्यकर्ते.
===Photopath===
051220\05nsk_5_05122020_13.jpg
===Caption===
नायब तहसीलदार बकरे यांना निवेदन देताना किसान सभेचे तालुका अध्यक्ष रामजी गावित, सेक्रेटरी भिका राठोड, सभापती मनिषा महाले, उपसभापती इंद्रजीत गावित आदींसह कार्यकर्ते.