केटीवेंअर फुटून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई देण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2019 07:23 PM2019-08-08T19:23:48+5:302019-08-08T19:24:07+5:30
ब्राह्मणगाव : गिरणा नदीवरील महाल पाटणे जवळ ५ आॅगस्ट रोजी महापूर आल्याने केटी वेअर फुटल्याने शेतकऱ्यांचे शेताचे मोठ्या प्रमाणात ...
ब्राह्मणगाव : गिरणा नदीवरील महाल पाटणे जवळ ५ आॅगस्ट रोजी महापूर आल्याने केटी वेअर फुटल्याने शेतकऱ्यांचे शेताचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याचा पंचनामा करून त्वरित भरपाई देण्याची मागणी प्रा. के. एन. अहिरे यांनी केली आहे.
महाल पाटणे जवळच्या गिरणा नदीवरील ४७ एम सी एफ टी हजार क्षमतेचा केटीवेअर बांधल्यामुळे ब्राह्मणगाव, महाल पाटणे, देवपुरपडे गिरणा काठालगतच्या शेतकºयांना शेती सिंचनसाठी या पाण्याचा चांगला उपयोग होत होता.
चार वर्षापूर्वी सप्टेंबर महिन्यात अवकाळी पावसाने व पाटबंधारे खात्याने केटीवेअर च्या फळ्या न काढल्याने पाण्याचा प्रचंड लोट येऊन धांद्री शिवारात सदर पाणी घुसून तेथील दोन शेतकºयांचे मका पिक वाहून गेले होते. त्यावेळी परिसरातील शेतकºयांनी पाटबंधारे खात्याकडे तक्र ार करून झालेल्या नुकसानीचा पंचनामा करण्यास भाग पाडले होते. सदर पंचनाम्या नंतर पाटबंधारे खात्याने उन्हाळ्यात नदी कोरडी असताना या ठिकाणी कॉँक्र ीट मध्ये ५० ते ७० फुटापर्यंत धक्का भिंत बांधणे गरजेचे होत.े परंतु खात्याकडून तसे काहीही करण्यात आले नाही. म्हणून त्यावेळी माजी जी. प. सदस्य पप्पू बछाव व केदा आहेर यांनी वाहने पुरवून व परिसरातील शेतकºयांनी लोकवर्गणीतून डिझेल खर्च करीत मातीचाबांध त्या ठिकाणी बांधला होता.
या वर्षी गिरणा नदीला आलेल्या महापुरामुळे पाच आॅगस्ट रोजी सदर बांध त्याच ठिकाणी फुटल्याने पुन्हा जवळील त्याच शेतकºयांचे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. तरी पाटबंधारे खात्याने सप्टेंबर महिन्यानंतर पाणी आडवण्यासाठी व परिसरातील शेतकºयांच्या शेती सिंचनासाठी त्वरित बांध बांधणे गरजेचे आहे. मे महिन्यापर्यंत पाटबंधारे खात्याने या कामाचा प्रस्ताव तयार करून या ठिकाणी बांधून देण्याचे व नुकसानग्रस्त शेतकºयांना पंचनामा करून त्वरित भरपाई देण्याची मागणी प्रा. अहिरे यांनी केली आहे.
(फोटो ०८ बंधारा)