नुकसानीचे पंचनामे करुन भरपाईची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2020 11:15 PM2020-09-20T23:15:34+5:302020-09-21T00:55:59+5:30
नांदगाव : तालुक्यातील पावसाने नुकसान झालेल्या भागाची तहसीलदार यांनी त्वरीत पाहणी करु न पंचनामे करावे अशी मागणी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष समाधान पाटील यांनी केली .
नांदगाव : तालुक्यातील पावसाने नुकसान झालेल्या भागाची तहसीलदार यांनी त्वरीत पाहणी करु न पंचनामे करावे अशी मागणी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष समाधान पाटील यांनी केली .
शनिवार रात्री झालेल्या पावसाने मोरझर, दहेगाव,मांडवड,सोयगाव,बाणगाव,वडाळी,भालुर आझादनगर परीसरातील शेतकर्यांचे शेती आणी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
मका पिके अक्षरश: जमिनदोस्त झाले तर नविन कांदा लागवड पुर्णत: वाया गेली महागामोलाचे का:दा रोपेही जमीनदोस्त झाल्याने शेतकर्यांवर आभाळ कोसळले आहे.शेतातील माती वाहुन गेल्याने शेतेही निकामी होऊ लागली असल्याने शेतकर्या:नी कसे जगायचे असा प्रश्न निर्माण झाला आहे.सतत ची नापीकी ला कंटाळलेल्या या भागातील शेतकर्यांनी कर्ज स्वरु पात तरी काहींनी उधार उसनवारीने पिके उभी केली परंतु ते ही निसर्गाला पाहवले नाही असे म्हणावे लागेल. तरी शासनाने या शेतर्क्यांना न्याय देवुन अस्मानी ,सुलतानी संकटातुन बाहेर काढावे. त्यामुळे तालुक्याचे तहसीलदारांनी तातडीने या भागाची पाहनी करु न शासनास अहवाल सादर करावा अशी मागणी केली आहे.
(फोटो : 20नांदगाव1)