प्रेसच्या आधुनिकीकरणाचे काम पूर्ण करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2019 01:21 AM2019-08-03T01:21:18+5:302019-08-03T01:21:55+5:30

आयएसपी मजदूर संघाचे जनरल सेक्रेटरी जगदीश गोडसे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन इंडिया सिक्युरिटी प्रेस व करन्सी नोट प्रेसचे मंजूर आधुनिकीकरण लवकरात लवकर पूर्ण केले जावे याकरिता पत्र दिले. यावेळी त्यांच्यासोबत खासदार हेमंत गोडसे व माजी समाजकल्याण मंत्री बबनराव घोलप उपस्थित होते.

Demand for completion of modernization of the press | प्रेसच्या आधुनिकीकरणाचे काम पूर्ण करण्याची मागणी

प्रेसच्या आधुनिकीकरणाचे काम पूर्ण करण्याच्या मागणीचे पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देताना जगदीश गोडसे, हेमंत गोडसे, बबनराव घोलप़

googlenewsNext

नाशिकरोड : आयएसपी मजदूर संघाचे जनरल सेक्रेटरी जगदीश गोडसे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन इंडिया सिक्युरिटी प्रेस व करन्सी नोट प्रेसचे मंजूर आधुनिकीकरण लवकरात लवकर पूर्ण केले जावे याकरिता पत्र दिले. यावेळी त्यांच्यासोबत खासदार हेमंत गोडसे व माजी समाजकल्याण मंत्री बबनराव घोलप उपस्थित होते.
इंडिया सिक्युरिटी प्रेस आणि करन्सी नोट प्रेसमध्ये असलेल्या जुन्या मशिनरींमुळे उत्पादनावर परिणाम होत असल्याने आयएसपी मजदूर संघाच्या वतीने सातत्याने आधुनिकीकरण करण्याची मागणी केली जात
आहे.
सन २०१२ पासून असलेल्या या मागणीमुळे व सततच्या पाठपुराव्यामुळे १४०० कोटी रुपयांच्या नवीन मशीनरींना व अनुषंगिक मॉडर्नायझेशनला मंजुरी मिळाली आहे. यापैकी २५० ते ३५० कोटींचे आधुनिकीकरण येत्या एक ते दीड वर्षात पूर्ण होणे अपेक्षित असून, उर्वरित काम पाच ते सहा वर्षांत पूर्ण करण्याचे निर्देश आहेत.
उत्पादन क्षमता वाढावी
आधुनिकीकरण त्वरित झाले तर ते उपयुक्त ठरणार असल्याने व जुन्या मशीनरी असूनही येथील कामगारांनी आरबीआयच्या पे्रसबरोबर स्पर्धा करून चांगले उत्पादन दिले आहे. मात्र वाढते ब्रेकडाउन सातत्याने मशीन मेन्टेनन्स या सर्वांवर मात करून उत्पादनाची वाढती गरज पूर्ण करण्याकरिता येथील उत्पादन क्षमता वाढण्याकरिता आधुनिकीकरण त्वरित झाले तर ते उपयुक्त ठरणार असल्याने आयएसपी मजदूर संघाचे जनरल सेक्रेटरी गोडसे यांनी पंतप्रधान यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे. या आधुनिकीकरणात अंतर्गत दोन मशीन लाइन, बीपीएस न्यूमरोटा, इन्टॅग्लीओ आदी मशिनरींचा समावेश असेल.

Web Title: Demand for completion of modernization of the press

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.