पालखेड कालवा पुलावरील संरक्षित कडे बांधण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2019 07:43 PM2019-03-21T19:43:17+5:302019-03-21T19:43:46+5:30
पाटोदा : गेल्या आठ दिवसांपासून पालखेड कालव्यास आवर्तन सुरु आहे.या कालव्याच्या ठाणगाव सीमेवरील पुलाचे संरक्षण कडे गेल्या काही वर्षांपासून ...
पाटोदा : गेल्या आठ दिवसांपासून पालखेड कालव्यास आवर्तन सुरु आहे.या कालव्याच्या ठाणगाव सीमेवरील पुलाचे संरक्षण कडे गेल्या काही वर्षांपासून खचल्यामुळे या ठिकाणी वारंवार अपघात होत असल्याने कालवा विभागाने या ठिकाणी त्विरत संरक्षण कडे बांधून होणारे अपघात थांबवावेत अशी मागणी होत आहे.
पाटोदा ठाणगाव सीमेवर शेळके वस्तीनजीक रस्त्याला समांतर पूल बांधलेला आहे.या ठिकाणी पूल व कालव्याची खोली सुमारे पस्तीस फुटाच्या आसपास आहे. या पुलाचे संरक्षण कडे गेल्या चार पाच वर्षांपासून तुटले आहे. त्यामुळे दिवसा तसेच रात्रीच्या वेळेस वाहन चालकांच्या हे लक्षात येत नसल्याने या ठिकाणी वारंवार अपघात होऊन वाहनांचे नुकसान होत आहे.
या ठिकाणी अपघात होऊन काही नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. मात्र पालखेड पाटबंधारे विभाग याकडे दुर्लक्ष करीत असल्याने नाराजी पसरली आहे. मागील मिहना दीड मिहन्यपुर्वीही या ठिकाणी अपघात होऊन ट्रक्टर या पुलावरून कोसळून कालव्यात पडला होता. असे असतांना व वारंवार मागणी करूनही या ठिकाणी पूल दुरु स्ती व संरक्षण कडे बांधले जात नसल्याने हा विभाग आणखीव अपघात व बळी जाण्याची वाट पाहत आहे का? असा सवाल या मार्गावरून प्रवास करणारे प्रवासी उपस्थित करीत आहे. याबाबत या भागातील काही नागरिकांनी संबधित विभागाकडे वारंवार निवेदने दिलेली आहे मात्र त्यांच्या मागणीला वाटण्याच्या अक्षदा वाटल्या जात असल्याने आंदोलन छेडण्याचा इशारा येथील नागरिकांनी दिला आहे.