शहर बससेवा नियमित सुरू ठेवण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2017 12:58 AM2017-08-29T00:58:26+5:302017-08-29T00:58:39+5:30
दोन दिवसांपूर्वी शहर बसच्या चालक, वाहकांनी अचानक बस बंद आंदोलन केल्याने नागरिकांचे झालेले हाल पाहता शहराची बससेवा पूर्ववत व व्यवस्थित चालवावी, अशी मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने केली आहे.
नाशिक : दोन दिवसांपूर्वी शहर बसच्या चालक, वाहकांनी अचानक बस बंद आंदोलन केल्याने नागरिकांचे झालेले हाल पाहता शहराची बससेवा पूर्ववत व व्यवस्थित चालवावी, अशी मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने केली आहे. यासंदर्भात एसटीच्या विभागीय नियंत्रकांना निवेदन देण्यात आले असून, त्यात म्हटले आहे की, एसटी कर्मचाºयांना रास्त वेतन, कामाचे नक्की तास, नोकरीची सुरक्षितता, दुरुस्ती या कर्मचाºयांच्या मागण्या रास्त असून, त्यांच्या या मागण्यांचा विचार करून त्यावर तोडगा काढण्यात यावा. शहर बससेवा तोट्यात असल्याचे प्रशासन नेहमीच सांगत असले तरी, सार्वजनिक उद्योग नीट चालविण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे. तोटा होणे हे कारण म्हणजे प्रशासनाचे नियोजन, वचक नसल्याचा पुरावा आहे. शहर बससेवेच्या त्रुटींमुळे शहरातील नागरिकही त्रस्त झाले असून, सामान्य व्यक्ती, विद्यार्थी बसने प्रवास करतात अशा परिस्थितीत शहर बससेवा बंद करणे योग्य नसल्याचे माकपने म्हटले आहे. शहरातील बससेवा पूर्ववत चालू ठेवा, बसफेºया वाढवा, सर्व
स्पेअर पार्ट व अन्य आवश्यक गोष्टींचा पुरवठा ठेवून बसेस दुरुस्त ठेवा, शहर बससेवेतील तोट्याची खरी कारणे शोधून त्यावर उपाययोजना करून तोटा नियंत्रित करण्याचे काम करा, शहर व परिसरातील ग्रामीण भागात पुरेशी प्रमाणात बससेवा त्वरित उपलब्ध करून द्या, अशी मागणीही या निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनावर डॉ. डी. एल. कराड, वसुधा कराड, सीताराम ठोंबरे, मोहन जाधव, भागवत डुंबरे, सिंधू शार्दुल, संजय पवार, सतीश खैरनार, कल्पना शिंदे आदींच्या स्वाक्षºया आहेत.