सिन्नर तालुका दुष्काळी जाहीर करण् याची काग्रेसची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2018 05:53 PM2018-08-19T17:53:56+5:302018-08-19T17:55:11+5:30
सिन्नर : गेल्या अडीच महिन्यांपासून पावसाळा सुरु झाला. परंतू सिन्नरच्या पूर्व भागात अद्यापही पाऊस पडलेला नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला असून पावसाच्या भरवशावर केलेल्या पेरण्या वाया गेल्या.
सिन्नर : गेल्या अडीच महिन्यांपासून पावसाळा सुरु झाला. परंतू सिन्नरच्या पूर्व भागात अद्यापही पाऊस पडलेला नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला असून पावसाच्या भरवशावर केलेल्या पेरण्या वाया गेल्या. तसेच माणसांच्या व जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठीही हाल होत असल्याने तालुका दुष्काळी जाहीर करावा अशी मागणी कॉँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष शरद शिंदे यांनी जिल्हाधिकारी, तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
जवळपास अर्धा पावसाळा झाला तरी सरासरीच्या निम्माही पाऊस तालुक्यात पडलेला नाही. पश्चिम पट्ट्यात थोडाफार पाऊस झाला. मात्र पूर्व भाग कोरडा असल्याने शेतकऱ्यांनी केलेल्या पेरण्या, दुबार पेरण्याही वाया गेल्या आहेत. मराठवाडा, विदर्भापेक्षाही भयानक स्थिती तालुक्याच्या पूर्व भागाची असून माणसांच्या पिण्याच्या पाण्याची तसेच जनावरांच्या चारा-पाण्याचीही भ्रांत झाली आहे. शासनाने या सर्व परिस्थितीचा विचार करून तालुका दुष्काळी जाहीर करावा. तसेच महसूल यंत्रणेमार्फत जागेवर जाऊन वस्तुनिष्ठ पंचनामे करावे, योग्य आणेवारी वर्गीकरण करावे, जनावरांच्या चारा व पिण्याच्या पाण्याची सोय करण्याची मागणी करण्यात आली आहे. बँका, सोसायटी, पतसंस्था, फायनान्स तसेच महावितरणची जाचक वसुली थांबवावी. आदी मागण्यांचे निवेदन देण्यात आले आहे. निवेदनावर कॉँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष शिंदे यांच्यासह तालुकाध्यक्ष विनायक सांगळे, शहराध्यक्ष मुजाहिद खतीब, तालुका उपाध्यक्ष गोपाळ गायकर, कैलास दातीर, गणेश जाधव, अर्जुन घोरपडे, दामु शेळके, दिनेश इंगळे, बाजीराव दळवी, छबु थोरात, रावसाहेब थोरात, नारायण पगार आदींच्या स्वाक्षºया आहेत.