डीजेच्या आवाजावर नियंत्रण ठेवण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2020 10:01 PM2020-02-25T22:01:48+5:302020-02-26T00:16:52+5:30
विविध कार्यक्र मात तसेच मिरवणुकांमध्ये वाजविण्यात येणाऱ्या डीजेच्या आवाजाची मर्यादा ओलांडली जात आहे. अशा मिरवणुकांतून ध्वनिप्रदूषण वाढत असल्याने मानसिक त्रास होत आहे. डीजे चालकांना समज देऊन आवाजावर नियंत्रण ठेवण्याची मागणी शहरातील व्यापारी व नागरिकांनी केली आहे. याबाबत सिन्नर पोलीस ठाण्याचे निरीक्षक साहेबराव पाटील यांना निवेदन देण्यात आले आहे.
सिन्नर : शहरात विविध कार्यक्र मात तसेच मिरवणुकांमध्ये वाजविण्यात येणाऱ्या डीजेच्या आवाजाची मर्यादा ओलांडली जात आहे. अशा मिरवणुकांतून ध्वनिप्रदूषण वाढत असल्याने मानसिक त्रास होत आहे. डीजे चालकांना समज देऊन आवाजावर नियंत्रण ठेवण्याची मागणी शहरातील व्यापारी व नागरिकांनी केली आहे. याबाबत सिन्नर पोलीस ठाण्याचे निरीक्षक साहेबराव पाटील यांना निवेदन देण्यात आले आहे.
शहरातील लाल चौक, गणेश पेठ, वावी वेस आदींसह विविध मार्गांवरून काढण्यात येणाºया डीजे मिरवणुकीमुळे ध्वनिप्रदूषण होत असते. डीजेचालक न्यायालयाने दिलेल्या आवाजाची मर्यादा ओलांडत असतात. मिरवणूक काढणारे व्यक्ती व डीजेचालकांच्या मनमानीमुळे न्यायालयाच्या निर्णयाचा भंग होत आहे. डीजेचालक व पोलिसांच्या बैठकीत हा मुद्दा मांडण्यात आला. मात्र कोणत्याही प्रकारची सुधारणा होत नाही. याबाबत दखल घेऊन डीजेचालकांना समज देण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
निवेदनावर ताराचंद खिंवसरा, मनोज भंडारी, श्याम गवळी, योगेश गडाख, सुधीर गवळी, वैभव कासार, अमोल कपोते, कांचेश पवार, आदींच्या सह्या आहेत.