ताहाराबादला कोरोना उपचार केंद्राची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:13 AM2021-05-01T04:13:26+5:302021-05-01T04:13:26+5:30

बागलाण तालुक्यातील ताहाराबाद व परिसर गेल्या दोन महिन्यांत कोरोना हॉटस्पॉट ठरला आहे. रोज रुग्णसंख्या वाढत आहे. मात्र कोरोना रुग्णांना ...

Demand for Corona Treatment Center at Taharabad | ताहाराबादला कोरोना उपचार केंद्राची मागणी

ताहाराबादला कोरोना उपचार केंद्राची मागणी

Next

बागलाण तालुक्यातील ताहाराबाद व परिसर गेल्या दोन महिन्यांत कोरोना हॉटस्पॉट ठरला आहे. रोज रुग्णसंख्या वाढत आहे. मात्र कोरोना रुग्णांना उपचारासाठी स्थानिक पातळीवर उपचार केंद्र नसल्याने रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांची मोठी गैरसोय होताना दिसत आहे. सध्या रुग्णसंख्या मोठ्या झपाट्याने वाढत आहे. त्यात रुग्ण दगावण्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. अशा परिस्थितीत कोरोना रुग्णांना उपचारासाठी स्थानिक पातळीवर उपचार केंद्र सुरू होणे गरजेचे बनले आहे. कोरोना रुग्णांना चाचणी सकारात्मक आल्यास त्वरित उपचार केंद्रात दाखल केल्यास कोरोना रुग्ण बरे होण्याची संख्या वाढून कोरोनाचा फैलाव कमी होण्यास मदत होणार आहे.

आयुष्मान भारत योजनाअंतर्गत गेल्या काही वर्षांपासून ताहाराबाद प्राथमिक आरोग्य केंद्र इमारत व कर्मचारी निवासस्थान यांचे काम सुरू होते. ते काम पूर्ण होऊन बराच कालावधी लोटूनही या इमारती उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असल्याने कोट्यवधी रुपये खर्चाच्या इमारती ' शो पीस ' बनल्या आहेत. विशेष म्हणजे कोरोनाच्या महाभयंकर साथीत शासनाच्या या इमारती वापराविना पडल्या आहेत.

इन्फो

ऑक्सिजन बेडची सुविधा द्या

ताहाराबाद व परिसरात कोरोनाचा वाढता फैलाव बघता प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन इमारतीत कोरोना उपचार केंद्र तत्काळ सुरू करून याठिकाणी ऑक्सिजन बेडसह सर्व सुविधा त्वरित उपलब्ध करून द्याव्यात तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रात अपूर्ण असलेल्या कर्मचाऱ्यांची त्वरित नियुक्ती करण्यात यावी जेणेकरून रुग्णांना उपचारासाठी अडचण निर्माण होणार नाही, अशी मागणी होत आहे.

फोटो - ३० ताहराबाद कोरोना

ताहाराबाद येथील नव्यानेच बांधण्यात आलेली आरोग्य केंद्राची इमारत.

===Photopath===

300421\30nsk_16_30042021_13.jpg

===Caption===

फोटो - ३० ताहराबाद कोरोनाताहाराबाद येथील नव्यानेच बांधण्यात आलेली आरोग्य केंद्राची इमारत. 

Web Title: Demand for Corona Treatment Center at Taharabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.