पांगरीकरांचा रस्ता रुंदीकरणास विरोध उड्डाणपूल किंवा बायपासची मागणी : भूमिअभिलेखच्या पथकाला धाडले माघारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2017 12:17 AM2017-11-17T00:17:48+5:302017-11-17T00:19:31+5:30
सिन्नर : सिन्नर - शिर्डी महामार्ग चौपदरीकरणासाठी मोजणीच्या कामाला आलेल्या भूमिअभिलेख खात्याच्या अधिकारी व कर्मचाºयांच्या पथकाला संतप्त पांगरीकरांनी गावठाण हद्दीतील मोजणी करू न देता माघारी धाडले.
सिन्नर-शिर्डी महामार्ग चौपदरीकरणाच्या मोजणीसाठी आलेल्या पथकासोबत चर्चा करताना पंचायत समिती सदस्य रवींद्र पगार यांच्यासह पांगरीचे ग्रामस्थ.
सिन्नर : सिन्नर - शिर्डी महामार्ग चौपदरीकरणासाठी मोजणीच्या कामाला आलेल्या भूमिअभिलेख खात्याच्या अधिकारी व कर्मचाºयांच्या पथकाला संतप्त पांगरीकरांनी गावठाण हद्दीतील मोजणी करू न देता माघारी धाडले.
सिन्नर - शिर्डी महामार्गाचे चौपदरीकरण होणार असून, रस्त्याच्या कडेला असलेल्या जमिनीचे संपादन केले जाणार आहे. यासंदर्भात वृत्तपत्रातून मोजणीसाठी नोटीस देण्यात आली आहे. पांगरी गाव सिन्नर-शिर्डी महामार्गावर दुतर्फा वसलेले आहे. गावातून जाणाºया महामार्गाच्या कडेला रहिवासी घरे व व्यावसायिक दुकाने आहेत. या महामार्गाच्या रुंदीकरणामुळे अनेक राहती घरे व दुकाने उद्ध्वस्त होण्याची भीती पांगरी ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
रस्ता मोजणीसाठी व मार्किंग करण्यासाठी भूमिअभिलेख विभागाचे कर्मचारी गुरुवारी पांगरी शिवारात पोहचले. याची माहिती मिळताच पंचायत समिती सदस्य रवींद्र पगार यांच्यासह प्रकाश पांगारकर, विलास निरगुडे, शिवाजी कांडेकर, राजू पगार, विष्णू निरगुडे, जनार्दन कलकत्ते, सुभाष पांगारकर, ज्ञानेश्वर पगार, भारत आवारी, दत्तू दळवी, सुनील पगार यांच्यासह ग्रामस्थांनी सुमारे एक किलोमीटर अंतर जाऊन या मोजणीची माहिती घेतली. सदर महामार्गाची पांगरी गावातून दुतर्फा मोजणी केली जाणार असल्याचे समजल्यानंतर ग्रामस्थ आक्रमक झाले.
त्यांनी मोजणीसाठी आलेल्या कर्मचाºयांना गावठाण हद्दीतील मोजणी न करता माघारी जाण्यास सांगितले. त्यानंतर मोजणी बंद करून कर्मचाºयांनी वरिष्ठांसोबत संपर्क साधला. त्यानंतर काही अधिकाºयांनी पांगरी येथे येवून ग्रामस्थांसोबत चर्चा केली. मात्र ग्रामस्थांनी बाजारपेठ उध्दवस्त होण्याची भीती व्यक्त करीत मोजणीस आक्षेप घेतला. त्यानंतर अधिकाºयांनी पांगरी गावठाण हद्दीतील मोजणी न करता पुढील वावी गावाच्या दिशेने मोजणी करण्याची निर्णय घेतला. खासदार हेमंत गोडसे व पांगरी ग्रामस्थांची चर्चा करुन त्यातून मार्ग काढणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
पांगरी गावातून महामार्ग करतांना रहिवासी घरे व दूकाने वाचविण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे. या पार्श्वभूमीवर पांगरीकरांनी मोजणीला विरोध केला. त्यामुळे अधिकाºयांना पांगरी गावठाण हद्दीतील मोजणी न करता पुढील कामासाठी रवाना व्हावे लागले.
महामार्ग रुंदीकरणाऐवजी उड्डाणपूल किंवा बायपास करण्याची मागणी पांगरी ग्रामस्थांनी राष्टÑीय महामार्गाच्या अधिकाºयांकडे व संबंधितांकडे निवेदनाद्वारे केली होती. गेल्या दोन दिवसांपासून मुसळगाव हद्दीपासून शिर्डीच्या दिशेने रस्ता मोजणीच्या व मार्किंगच्या कामास प्रारंभ करण्यात आला आहे.