निफाड तालुक्यातील नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2019 02:41 PM2019-10-31T14:41:53+5:302019-10-31T14:42:48+5:30
ओझर: निफाड तालुक्यातील गोदाकाठच्या करंजगाव, शिंगवे, म्हाळसाकोरे, भुसे परिसरासह उगांव-शिवडी, खेडे, वनसगांव, सारोळे, नांदुर्डी, सोनेवाडी, नैताळे, रामपुर, कोळवाडी, शिवरे या गावांत विजांच्या कडकडाटासह पावसाने शेतमालाचे नुकसान झाले आहे.
ओझर: निफाड तालुक्यातील गोदाकाठच्या करंजगाव, शिंगवे, म्हाळसाकोरे, भुसे परिसरासह उगांव-शिवडी, खेडे, वनसगांव, सारोळे, नांदुर्डी, सोनेवाडी, नैताळे, रामपुर, कोळवाडी, शिवरे या गावांत विजांच्या कडकडाटासह पावसाने शेतमालाचे नुकसान झाले आहे. तालुक्यातील द्राक्ष बागांसह इतर पिकांचे गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या पावसाने अतोनात नुकसान केले आहे. त्यामुळे निफाड तालुक्यातील नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी माजी आमदार अनिल कदम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सोमवारी सायंकाळी निफाड तालुक्यात सुमारे सव्वा तासाहुन अधिक काळ पावसाचा जोर होता. या पावसाचा सर्वाधिक फटका द्राक्ष उत्पादकांना बसत आहे. सद्यस्थितीत द्राक्षबागांच्या छाटणीनंतर द्राक्षबागा पोंगा व फुलोरा अवस्थेत आहे. या अवस्थेत सतत पाऊस होत असल्याने द्राक्षबागेच्या पानांवर व घडांवर करपा डावणी यासारखे रोग बळावत आहेत. तसेच फुलोर्यातील द्राक्षमण्यांची गळ अन घडकुज या पाऊसाने होत आहे. दररोज हजार दोन हजार
रूपयांच्या रोगप्रतिकारक औषधांची फवारणी करायची अन पुन्हा पाऊसाने त्यावर पाणी फेरायचे हे नित्याचे झाले आहे. महिनाभरापासुन सतत पावसाच्या आणि ढगाळ वातावरणामुळे सुर्यप्रकाश न मिळाल्याने द्राक्षबागांत असलेल्या मुळ्या बंद पडत आहे. त्याचा परिणाम थेट ओलांड्यावर फांदीला मुळ्या फुटत आहे. नविन द्राक्षमाल जिरण्याचे प्रमाणही वाढत आहे. त्यामुळे शेतकºयांना दिलासा देणे गरजेचे असल्याचे तातडीने पंचनामे करावे, अशी मागणीही कदम यांनी केले आहे.
द्राक्ष उत्पादक शेतकºयांबरोबरच सोयाबीन, मका, ऊस, भाजीपाला उत्पादक शेतकर्यांचेही भरपूर नुकसान या अतिवृष्टीमुळे झाले आहे. त्यामुळे सर्वच पिकांचे पंचनामे करून शेतकºयांना तातडीची मदत जाहीर करावी, अशी मागणी कदम यांनी निवेदनात केली आहे.