शेतीसाठी दिवसा वीजपुरवठा करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 04:41 AM2021-01-08T04:41:15+5:302021-01-08T04:41:15+5:30
महावितरण कंपनीकडून प्रत्येक महिन्यात शेतकऱ्यांच्या वीजपुरवठा वेळोवेळी बदल केले जातात. प्रत्येक महिन्याला रात्री व दिवसा वेगवेगळे भारनियमन करून एक ...
महावितरण कंपनीकडून प्रत्येक महिन्यात शेतकऱ्यांच्या वीजपुरवठा वेळोवेळी बदल केले जातात. प्रत्येक महिन्याला रात्री व दिवसा वेगवेगळे भारनियमन करून एक प्रकारे शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. शेतकऱ्यांनी शेतामध्ये कांदा, गह, हरभरा, कोबी, वांगी आदीसह शेतमाल घेतला असून, या मालाला वेळेत पाणी देणे शेतकरी वर्गाला शक्य होत नाही. बदलत जाणाऱ्या वेळेमुळे शेतकऱ्यांना रात्री-अपरात्री थंडीमध्ये शेतामध्ये पाणी देण्यासाठी कसरत करावी लागत आहे. यामुळे अनेक शेतकऱ्यांना रात्री- अपरात्री शेतामध्ये जंगली प्राण्यांचा सामना करून शेताला पाणी द्यावे लागत आहे. या सर्व गोष्टीचा विचार करता शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा देण्याची मागणी चकणे यांनी केली आहे. गेल्या काही दिवसांपासून वातावरणात दररोज बदल होत असल्याने पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना महागडी औषधे घेऊन फवारणी करावी लागत आहे. यावर्षी सर्वच बाजूंनी शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.