कोरोनाने दगावलेल्या शिक्षकांचे मृत्यू दाखले देण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 04:11 AM2021-06-27T04:11:11+5:302021-06-27T04:11:11+5:30
कोरोनामुळे मृत्यू झाल्याचा दाखला न मिळाल्यास संबंधितांच्या वारसांना अनेक प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागणार आहे. शासनाच्या विविध योजनांच्या लाभापासून ...
कोरोनामुळे मृत्यू झाल्याचा दाखला न मिळाल्यास संबंधितांच्या वारसांना अनेक प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागणार आहे. शासनाच्या विविध योजनांच्या लाभापासून वंचित राहावे लागणार आहे, सदर दाखले मिळण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी आसिफ शेख यांना निवेदन देऊन त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी नाशिक येथील माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालय व वेतन पथक कार्यालयातील सुरू असलेल्या दफ्तरदिरंगाई बाबतही तक्रार करण्यात आली. गेल्या चार महिन्यापासून माध्यमिक विभागाचे वेतन वेळेवर होत नाही, वेतन पथक अधीक्षक देवरे व शिक्षणाधिकारी वैशाली झनकर या कार्यालयात भेटत नाहीत. शिक्षकांना किरकोळ कामांसाठी चकरा माराव्या लागतात, अशा तक्रारीही यावेळी मांडण्यात आल्या. यासंदर्भात आसिफ शेख यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करण्याचे आश्वासन देतानाच प्रसंगी आंदोलनाचाही इशारा दिला. याप्रसंगी महाराष्ट्र टीडीएफचे कार्याध्यक्ष फिरोज बादशहा, रईस अहमद, आर. डी. निकम, साजीद अन्सारी, अर्शद हुसेन आदी उपस्थित होते.