शेतकऱ्यांना कर्जमाफी, वीजबिल माफीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2020 02:36 PM2020-08-04T14:36:31+5:302020-08-04T14:37:15+5:30

नांदूरवैद्य : महाराष्ट्राची चेरापूंजी म्हणून ओळख असणाºया इगतपुरी तालुक्यात यावर्षी अजूनही पावसाचे शेतकऱ्यांना दिलासा देणारे आगमन न झाल्यामुळे तालुक्यातील मुख्य पिक असलेल्या भात पिकाची पाण्याअभावी नुकसान झाले असून भात पिक करपून चालले असतांना दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होत चालली आहे. याच पार्श्वभूमीवर इगतपुरी तालुका भारतीय जनता पक्षाच्या वतीने इगतपुरीचे तहसिलदार परमेश्वर कासुळे यांना निवेदन देण्यात आले आहे.

Demand for debt waiver, electricity bill waiver for farmers | शेतकऱ्यांना कर्जमाफी, वीजबिल माफीची मागणी

इगतपुरी तालुका भारतीय जनता पक्षाच्या वतीने तहसिलदार परमेश्वर कासुळे यांना निवेदन देतांना भाऊसाहेब कडभाने समवेत रमेश परदेशी, पांडुरंग बºहे, संपत काळे व इतर पदाधिकारी.

Next
ठळक मुद्देइगतपुरी : भाजपच्या वतीने तहसिलदारांना दिले निवेदन

नांदूरवैद्य : महाराष्ट्राची चेरापूंजी म्हणून ओळख असणाºया इगतपुरी तालुक्यात यावर्षी अजूनही पावसाचे शेतकऱ्यांना दिलासा देणारे आगमन न झाल्यामुळे तालुक्यातील मुख्य पिक असलेल्या भात पिकाची पाण्याअभावी नुकसान झाले असून भात पिक करपून चालले असतांना दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होत चालली आहे. याच पार्श्वभूमीवर इगतपुरी तालुका भारतीय जनता पक्षाच्या वतीने इगतपुरीचे तहसिलदार परमेश्वर कासुळे यांना निवेदन देण्यात आले आहे.
तालुक्यावर आलेल्या संकटातून शेतकºयांना तारण्यासाठी शेतकºयांचे संपुर्ण कर्ज माफ करावे तसेच वीजबील माफ करावे तालुक्यातील शेतकºयांना दुष्काळी परिस्थितीतमुळे शासनाच्या सर्व प्रकारच्या दुष्काळी योजना जाहीर कराव्यात अशी मागणी दिलेल्या निवेदनात केली आहे.
निवेदन देतेवेळी भाजपा जिल्हा चिटणीस पांडुरंग बºहे, उपाध्यक्ष रमेश परदेशी, तालुकाध्यक्ष भाऊसाहेब कडभाने, संघटक सरचिटणीस तानाजी जाधव, संपत काळे, इगतपुरी शहर अध्यक्ष सागर हंडोरे, अनुसूचित जमाती जिल्हा उपाध्यक्ष निखील हंडोरे, युवा तालुका अध्यक्ष लालचंद पाटील, चेतन जोशी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Demand for debt waiver, electricity bill waiver for farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.