नांदगाव, मालेगाव दुष्काळी जाहीर करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2018 12:36 AM2018-10-06T00:36:55+5:302018-10-06T00:37:17+5:30
नाशिक जिल्ह्णातील नांदगाव व मालेगाव तालुक्यात यावर्षी पावसाने पुन्हा ओढ दिल्याने दोन्ही तालुक्यात दुष्काळजन्य परिस्थित निर्माण झाली असून, पिण्याच्या पाण्यासाठी आतापासूनच टॅँकर सुरू झाले आहेत. त्यामुळे दोन्ही तालुके दुष्काळी जाहीर करावेत, अशी मागणी जिल्हा परिषदेच्या बांधकाम सभापती मनीषा पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
नाशिक : जिल्ह्णातील नांदगाव व मालेगाव तालुक्यात यावर्षी पावसाने पुन्हा ओढ दिल्याने दोन्ही तालुक्यात दुष्काळजन्य परिस्थित निर्माण झाली असून, पिण्याच्या पाण्यासाठी आतापासूनच टॅँकर सुरू झाले आहेत. त्यामुळे दोन्ही तालुके दुष्काळी जाहीर करावेत, अशी मागणी जिल्हा परिषदेच्या बांधकाम सभापती मनीषा पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
यासंदर्भात सभापती मनीषा पवार यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची विभागीय आयुक्त कार्यालयात भेट घेत नांदगाव व मालेगाव तालुक्यांतील सद्य:स्थिती निदर्शनास आणून देताच जिल्ह्णातील अन्य तालुक्यांच्या तुलनेते नांदगाव व मालेगावमध्ये अत्यल्प पाऊस झाल्याचे सांगितले. पावसाने दडी मारल्याने खरीप हंगाम वाया गेला असून, शेतकरी हवालदिल झाला आहे. परतीच्या पावसाची शक्यताही कमी असल्याने रब्बीलाही फटका बसण्याची शक्यता आहे.