मेहुणे परिसरात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2018 07:48 PM2018-08-30T19:48:16+5:302018-08-30T19:49:03+5:30

मालेगाव तालुक्यातील मेहुणे गावासह परिसरात दुष्काळ जाहीर करावा अशा मागणीचे निवेदन अपर जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत यांना सादर करण्यात आले. तीन महिन्यांपासुन मेहुणे परिसरात समाधानकारक पाऊस झालेला नाही. रिमझिम पावसावर शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरण्या केल्या. पावसाअभावी पिके करपली असून परिसरात दुष्काळाचे संकट उभे राहिले आहे.

Demand for declaring drought in Mehunay area | मेहुणे परिसरात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

मेहुणे परिसरात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

Next

परिसरातील ग्रामस्थांना भरपावसाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. जनावरांच्या चाºयाचा प्रश्न निर्माण झाला आहे. पाण्याअभावी शेतमजुरांना काम नसल्याने मजुरी अभावी उपासमारीची परिस्थिती निर्माण झाली आहे. गावातील शेतकºयांनी पेरणीसाठी मोठा खर्च केला आहे. प्रशासनाने या भीषण दुष्काळाची कोणतीही दखल घेतलेली नाही. शिवारभेट देऊन दुष्काळी पंचनामे केले नाहीत. पाणीपुरवठा करणारे टँकर पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून दिलेले नाहीत. शेताकºयांना दिलासा मिळावा म्हणून शासनाने या दुष्काळी परिस्थितीवर मार्ग काढावा. परिसरात जनावरांची संख्या जास्त प्रमाणात असल्या कारणाने जनावरांसाठी चारा छावण्या उभाराव्यात. पाणी पुरवठा करणारे टँकर वाढविण्यात यावेत. मेहुणे गाव व परिसरात दुष्काळ जाहीर करून तात्काळ पंचनामे व उपाययोजना करण्यात याव्यात, गावात रोजगार हमी योजनेचे कामे उपलब्ध करून देण्यात यावी अशा मागण्यांचा निवेदनात समावेश आहे. अपर जिल्हाधिकारी कार्यालयाचे नायब तहसीलदार रविंद्र सायंकर यांनी निवेदन स्वीकारले. निवेदनाच्या प्रती प्रांताधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी यांना देण्यात आल्या आहेत. निवेदनावर सरपंच सुशीला देवरे, उपसरपंच निवृती देवरे, निखिल पवार, अतुल लोढा, अनिल देवरे, आबा देवरे, तात्यासाहेब देवरे, नानासाहेब देवरे, भरत देवरे, शिवाजी बच्छाव, धम्मपाल गरु ड, रिकू देवरे, निंबा अहिरे, संजय देवरे, गौरव देवरे आदींच्या सह्या आहेत.

Web Title: Demand for declaring drought in Mehunay area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.