गोदापात्राचे तळ कॉँक्रीटीकरण हटविण्याची पुन्हा मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2020 04:12 PM2020-03-17T16:12:13+5:302020-03-17T16:16:27+5:30
नाशिक : गोदावरी नदीचे तळ कॉँक्रिटीकरण हटविण्यास मध्यंतरी झालेला विरोध तसेच आरोप प्रत्यारोप यामुळे थंड बस्त्यात गेलेल्या या विषयाने पुन्हा एकदा उचल घेतली आहे. नदीपात्रालगत चाचणी कुपनलिका घेऊन संपूर्ण पात्रातील जलस्त्रोत जीवित आहेत किंवा नाही याची माहिती कशी काय मिळेल? असा प्रश्न कॉँक्रिटीकरणमुक्तीसाठी पुढाकार घेणारे गोदाप्रेमी संस्थेचे देवांग जानी यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी स्मार्ट सिटी कंपनीला पत्र दिले असून, तळ कॉँक्रिटीकरण त्वरित हटविण्याची मागणी केली आहे.
नाशिक :गोदावरी नदीचे तळ कॉँक्रिटीकरण हटविण्यास मध्यंतरी झालेला विरोध तसेच आरोप प्रत्यारोप यामुळे थंड बस्त्यात गेलेल्या या विषयाने पुन्हा एकदा उचल घेतली आहे. नदीपात्रालगत चाचणी कुपनलिका घेऊन संपूर्ण पात्रातील जलस्त्रोत जीवित आहेत किंवा नाही याची माहिती कशी काय मिळेल? असा प्रश्न कॉँक्रिटीकरणमुक्तीसाठी पुढाकार घेणारे गोदाप्रेमी संस्थेचे देवांग जानी यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी स्मार्ट सिटी कंपनीला पत्र दिले असून, तळ कॉँक्रिटीकरण त्वरित हटविण्याची मागणी केली आहे.
महापालिकेने रामकुंड परिसरातील गोदापात्रावर तळ कॉँक्रिटीकरण केले आहे. त्यामुळे नैसर्गिक जलस्रोत आणि पुरातन १७ कुंडे हे बंद झाली आहेत. त्यामुळे नदीचे प्रदूषण वाढत आहे, असा दावा करीत जानी यांनी यापूर्वी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यानुसार महापालिकेने यासंदर्भात तुकाराम मुंढे आयुक्त असताना सकारात्मक भूमिका घेतली होती. त्यानंतर स्मार्ट सिटी कंपनीच्या वतीने प्रोजेक्ट गोदा प्रकल्प राबविण्यात येत असून, त्याअंतर्गत गोदापात्राचे तळ कॉँक्रिटीकरण काढण्याचे ठरले.
कंपनीला सादरीकरण केल्यानंतर वास्तुशास्त्र महाविद्यालयाच्या प्राचार्य प्राजक्ता बस्ते यांनी यासंदर्भात अहवालही तयार केला. तो कंपनीने मान्य केल्यानंतर निविदा मागविण्यात आल्या. सदरचे काम सुरू होत असताना काहींनी विरोध केल्याने हे काम बंद करण्यात आले असून, त्यासंदर्भात जानी यांनी कंपनीला पत्र पाठवून तळ कॉँक्रिटीकरण हटविण्याचा प्रवास नमूद केला आहे.