गिरणारे चौफुलीवर गतिरोधकाची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2018 12:35 AM2018-11-29T00:35:52+5:302018-11-29T00:36:10+5:30
गिरणारे गावाजवळील चौफुली रस्त्यावर वाहनांची गती कमी करण्यासाठी व अपघात टाळण्यासाठी येथे गतिरोधक बसविण्याची मागणी नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभाकडे केली आहे.
गंगापूर : गिरणारे गावाजवळील चौफुली रस्त्यावर वाहनांची गती कमी करण्यासाठी व अपघात टाळण्यासाठी येथे गतिरोधक बसविण्याची मागणी नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभाकडे केली आहे. नाशिक-गिरणारे, धोंडेगाव-गिरणारे, वाडगाव-गिरणारे, गिरणारे ते गंगापूर धरण अशी चौफुली या गिरणारे-नाशिक रस्त्यावर असून, चारही बाजूने याठिकाणी वाहनांची वर्दळ सुरू असते तसेच आता दिवाळीच्या सुट्ट्या संपल्यानंतर चौफुलीच्या शेजारीच असलेल्या शाळा, महाविद्यालयातून विद्यार्थी सुटल्यानंतर वेगाने घराकडे जाण्याची ओढ असते त्यात हा रास्ता नेहमी वर्दळीचा असल्याने अपघाताचा धोका संभवू शकतो त्यामुळे स्थानिक नागरिकांनीच येथे गतिरोधक बसविण्याची मागणी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली आहे. यापूर्वी या चौफुलीवर व गिरणारे पोलीस चौकीच्या ठिकाणी तसेच नागलवाडी फाट्यावर प्लॅस्टिकच्या पट्ट्यांचे गतिरोधक तयार करण्यात आले होते. परंतु या रस्त्यावरील वाहतूक बघता त्या प्लॅस्टिकच्या गतिरोधकांनी जीव सोडून दिल्याने रस्त्यापासून उखडले आहे. त्यामुळे रस्ता पुन्हा सुसाट झाल्याने वाहने जास्त वेगाने जात असल्याने पुन्हा याठिकाणी अपघात होऊन दुर्घटना होण्याचा धोका संभवतो आहे. यासाठी गिरणारे गावातील व परिसरातील नागरिकांनी त्वरित याठिकाणी गतिरोधक बसविण्याची मागणी मागणी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली आहे.