विनयनगर अड्डा उद्ध्वस्त करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:25 AM2021-03-04T04:25:04+5:302021-03-04T04:25:04+5:30

भरधाव वाहनांमुळे अपघाताला निमंत्रण नाशिक : शहरात गेल्या आठ दिवसांत अनेक ठिकाणी अपघाताच्या घटना घडल्या आहेत. त्यामध्ये काहींना प्राण ...

Demand for demolition of Vinayanagar base | विनयनगर अड्डा उद्ध्वस्त करण्याची मागणी

विनयनगर अड्डा उद्ध्वस्त करण्याची मागणी

Next

भरधाव वाहनांमुळे अपघाताला निमंत्रण

नाशिक : शहरात गेल्या आठ दिवसांत अनेक ठिकाणी अपघाताच्या घटना घडल्या आहेत. त्यामध्ये काहींना प्राण गमवावे लागो, तर बरेच लोक जखमीदेखील झाले आहेत. भरधाव वेगाने वाहन चालविताना समोरून येणाऱ्या वाहनाला धडक तसेच रस्त्याच्या कडेने जाणाऱ्यांनादेखील धडक देण्याच्या घटना घडल्या आहेत. सुसाट वेगाने धावणाऱ्या वाहनांमुळे अपघात घडल्याच्या नोंदी पोलिसांत झालेल्या आहेत.

बनावट दस्तऐवजची अनेक प्रकरणे

नाशिक : बनावट दस्तऐवज तयार करून जमीन विक्री व्यवहार करण्याचे प्रकार शहरातील हद्दीत अनेकदा समोर आलेले आहेत. काही प्रकरणांमध्ये जमीनधारकाला धमकावणे, मारहाण करण्याचेदेखील प्रकार समोर आलेले आहेत. जमीन प्रकरणात गुन्हेगारी वाढत असल्याचे अनेक घटनांवरून दिसून येते. याप्रकरणी कठोर कायदा करण्याची गरज असल्याचे बोलले जात आहे.

जिल्ह्यात जंतविरोधी मोहीम सुरू

नाशिक : जिल्ह्यात १ ते १९ वर्ष वयोगटातील शाळेत जाणाऱ्या मुलामुलींना जंतविरोधी गोळ्या दिल्या जाणार आहेत. या दिवशी मोहिमेत सहभागी होऊ न शकलेल्या मुलांना ८ मार्च रोजी विशेष मोहीम घेऊन गोळ्याांचे वाटप केले जाणार आहे. याबाबतची तयारी करण्यात आली आहे. या मोहिमेसाठी जनजागृतीदेखील केली जाणार आहे.

दिवसाढवळ्या चोरीचे प्रकार

नाशिक : शहरात दिवसाढवळ्या चोरीचे प्रकार वाढले आहेत. विशेषत: सिडको तसेच इंदिरानगर परिसरात बंगले, रो-हाऊस तसेच सोसायटीच्या आवारातील वस्तू चोरून नेण्याच्या घटना घडत आहेत. अनेकदा नागरिकांच्या घरात घुसून लूटमार करण्याचेदेखील अनेक गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामुळे विनयभंगाचेदेखील प्रकार घडले आहेत.

उपनगर रस्ता झाला स्मार्ट रोड

नाशिक : उपनगर येथील मुख्य रस्ता अद्याप दुर्लक्षित असला तरी शांती पार्कजवळील रस्ता स्मार्ट रोड झाला आहे. या मार्गावार सुसज्य असे पदपथ आणि रस्त्याचे रूंदीकरण करण्यात आल्याने रस्ता विस्तीर्ण झाला आहे. डांबरीकरणामुळे या रस्त्याचे रूप पालटले आहे.

Web Title: Demand for demolition of Vinayanagar base

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.