श्रीदावलेश्वर महादेव तीर्थक्षेत्र विकासाची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2020 11:35 PM2020-10-06T23:35:01+5:302020-10-07T01:07:03+5:30
त्र्यंबकेश्वर : तालुक्यात गुजरात सिमेवर दावलेश्वर महादेव हे प्रसिध्द तिर्थक्षेत्र आहे. सिमा परिसरातील भाविकांचे आराध्य दैवत असलेले हे स्थान ...
त्र्यंबकेश्वर : तालुक्यात गुजरात सिमेवर दावलेश्वर महादेव हे प्रसिध्द तिर्थक्षेत्र आहे. सिमा परिसरातील भाविकांचे आराध्य दैवत असलेले हे स्थान गुजरातमधील दमणगंगा नदीकाठी असुन मंदीर परिसर तिर्थक्षेत्र व पर्यटन स्थळ म्हणुन विकसित केल्यास आणि दमणगंगा नदीवर पूल उभारल्यास भाविकांना श्रीक्षेत्र दावलेश्वर सह भगवान त्र्यंबकराजाचे दर्शन देखील घेता येणे शक्य होणार आहे.
दमणगंगा नदीवर पुल झाल्यास पेठ, सापुतारा, वलसाड, गुजरात तसेच नाशिक, सटाणा, धुळे, नवापुर ते गुजरात नाशिक, त्र्यंबक, जव्हार, चारोटी नाका ते अहमदाबाद एक्सप्रेस हायवे मार्गे गुजरात तसेच त्र्यंबकेश्वर, हरसूल, दावलेश्वर मार्गे गुजरात या मार्गानेही गुजरातच्या लोकांना महाराष्ट्रात येता येईल. त्यातून व्यापार उदीम वाढु शकेल. विशेष म्हणजे सिमेवरील आदिवासी बांधवांची मातृभाषा मराठी व गुजरातीच आहे. दावलेश्वर तिर्थक्षेत्र व पर्यटन स्थळ म्हणुन विकसित झाल्यास भविष्यात तिर्थक्षेत्रांना जोडणारा मार्ग म्हणुन चालना मिळेल. त्र्यंबकेश्वरमधील साधु महंतांचीसुद्धा ही प्रमुख मागणी आहे. दावलेश्वर बरोबरच ज्योतिर्लिंग श्रीत्र्यंबकेश्वर ही दोन्ही तिर्थस्थळे जोडता येतील. त्यामुळे पुलाची मागणी मागणी गुजरातमधील मुहपाडा, बिला, असलोणा, सावडा, चिलारमाळ, चिकाडी, मोरचौडा, रोहेळा तसेच महाराष्ट्रातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील कास, घोडमाणी, हेदडपाणा, कामथपाडा, बुगद, काकपाणा, बेहेड पाडा, सादडपाडा, बाफणविहीर, देलडोंगरी, गौळपाडा, देवडोंगरा, साणीपाडा, काथवडपाडा, गोलदरी, चिंचओहळ आदी गावच्या लोकांनी केली असल्याची माहिती मुलवडचे ग्रामपंचायत सदस्य रघुनाथ घाटाळ यांनी दिली.