घरोघरी जाऊन तपासणी करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 06:59 PM2021-04-24T18:59:40+5:302021-04-24T19:01:04+5:30

सायखेडा : तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोनाचे रुग्ण वाढत असून आरोग्य विभागाने गावातील नागरिकांच्या विशेष पथकाची नेमणूक करून घरोघरी जाऊन आरोग्य तपासण्या कराव्यात अशी मागणी होऊ लागली आहे.

Demand for door-to-door investigation | घरोघरी जाऊन तपासणी करण्याची मागणी

घरोघरी जाऊन तपासणी करण्याची मागणी

Next
ठळक मुद्देसायखेडा : कोरोना संसर्गाने रुग्णसंख्येत वाढ

सायखेडा : तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोनाचे रुग्ण वाढत असून आरोग्य विभागाने गावातील नागरिकांच्या विशेष पथकाची नेमणूक करून घरोघरी जाऊन आरोग्य तपासण्या कराव्यात अशी मागणी होऊ लागली आहे.

निफाड तालुक्यातील सर्व आरोग्य केंद्रांमध्ये गेल्या महिनाभरापासून ॲंटिजेन टेस्ट करण्यास सुरुवात झाली आहे. यामध्ये रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. तसेच येथील खासगी रुग्णालयातदेखील ताप, सर्दी, अंगदुखी, डोकेदुखी आदी आजारानी त्रस्त असलेल्या रुग्णांची गर्दी होत आहे. गावात कोरोना बाधित रुग्णांचीही संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाच्या मुख्य लक्षणांमध्ये हे सर्व आजार आढळून येत असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. असे नागरिक खबरदारीचा उपाय व सावधानता म्हणून तशी लक्षणे आढळून आल्यास स्वत:हून कोविड केंद्रामध्ये जाऊन ॲंटिजेन टेस्ट करुन घेताना दिसून येत आहेत. पण काही नागरिक भीतीपोटी सर्दी, ताप, खोकला या आजारांवर घरगुती उपचार घेत आहेत. त्यातून बाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे आरोग्य विभागाने घरोघरी जाऊन तपासणी करावी, अशी मागणी होऊ लागली आहे.

गावातील प्रत्येक घरात जाऊन आरोग्य विभाग जोपर्यंत तपासण्या करणार नाही, तोपर्यंत कोरोनाचा संसर्ग कमी होणार नाही. भितीने ॲंटिजेन टेस्ट करण्यास पुढे येत नाहीत. त्या नागरिकांसाठी आरोग्य विभागाने ठोस पावले उचलायला हवीत.
- सुरेश खैरनार, सरपंच, रामनगर.

Web Title: Demand for door-to-door investigation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.