शेतकऱ्यांना नुकसान भरपाई लवकर देण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2019 11:15 PM2019-11-04T23:15:35+5:302019-11-05T00:32:43+5:30
नांदूरवैद्य : अवकाळी पावसामुळे इगतपुरी तालुक्यातील मुख्य पिक असलेल्या भातासह अन्य पिकेही उद्ध्वस्त झाली आहेत. तालुक्यातील शेतकरी हवालिदल झाला आहे. याच पाशर््वभूमीवर पावसामुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागात शेतकऱ्यांच्या पिकांचे तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई व संपूर्ण कर्जमाफी करण्यात यावी अशी मागणी छावा क्र ांतीवीर सेनेने इगतपुरीच्या तहसिलदार अर्चना भाकड यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

इगतपुरी तालुक्यात सर्वञ अवकाळी पाऊस झाल्यामुळे तालुक्यातील शेतकर्यांचे भात, सोयाबीन, मका आदींसह नुकतेच लागवड करण्यात आलेल्या फळे, पालेभाज्या, टोमॅटो आदिंचे अतोनात नुकसान झाले आहे.
त्याचप्रमाणे इगतपुरी तालुक्यातील मुख्य पिक असलेल्या भात पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. पिकांमध्ये पाणी असल्यामुळे ती सडून लागली आहेत.
यामुळे या नुकसानग्रस्त भागातील शेतकºयांना त्वरीत नुकसान भरपाई देवुन त्यांच्यावर असलेला कर्जाचा बोजा कमी करण्यात यावा.
तसेच तालुक्यातील अनेक शेतकºयांनी पिकविमे काढले आहेत. ज्या शेतकºयांनी पिकविमे काढले नसतील अशा नुकसानग्रस्त शेतकºयांºया पिक नुकसानीचे पंचनामे करु न विमा कंपन्यांकडून नुकसान भरपाई मिळविण्याकरिता कृषी व महसूल विभागाने संबंधितांना अहवाल सादर करावा, अशी मागणी छावा क्र ांतीवीर सेनेने तहसिलदारांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
निवेदन देतेवेळी छावा क्र ांतीवीर सेनेचे इगतपुरी तालुकाध्यक्ष गोकुळ धोंगडे, युवा तालुकाध्यक्ष रोहिदास काळे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.