एचएएल वेल्फेअर अॅँड रिक्र ेशन क्लबची निवडणूक घेण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2020 15:49 IST2020-09-02T15:48:27+5:302020-09-02T15:49:40+5:30
ओझरटाऊनशिप : येथील एच ए एल कारखान्यातील कामगार व अधिकाऱ्यांच्या वेल्फेअर अँड रिक्र ीऐशन क्लब (एच ए ई डब्लू आर सी) संस्थेची निवडणुक लवकरात लवकर घेण्यात यावी अशी मागणी क्लबचे माजी सरचिटणीस दिपक टावरे यांनी कामगारांच्या वतीने एका निवेदनाद्वारे एचएएल व्यवस्थापनाकडे केली आहे.

एचएएल वेल्फेअर अॅँड रिक्र ेशन क्लबची निवडणूक घेण्याची मागणी
ओझरटाऊनशिप : येथील एच ए एल कारखान्यातील कामगार व अधिकाऱ्यांच्या वेल्फेअर अँड रिक्र ीऐशन क्लब (एच ए ई डब्लू आर सी) संस्थेची निवडणुक लवकरात लवकर घेण्यात यावी अशी मागणी क्लबचे माजी सरचिटणीस दिपक टावरे यांनी कामगारांच्या वतीने एका निवेदनाद्वारे एचएएल व्यवस्थापनाकडे केली आहे.
संस्थेच्या विद्यमान कार्यकारिणीचा कार्यकाळ हा १७ जून २०१९ रोजी संपलाआहे. कार्यकाळ संपून १४ महिने जास्त झाले आहे. संस्थेच्या नियमा प्रमाणे संस्था पदाधिकारी कार्यकाळ फक्त २ वर्षाचा असतो पण आता मुदत संपून १४ महिने झाले तरी निवडणूक घेण्यात आलेली नाही. याबाबत कामगारामध्ये नाराजी आहे. या सर्व बाबीचा विचार करून या संस्थेची निवडणूक लवकर घेण्यात यावी, असे निवेदनात म्हटले आहे.