वीजबील वसुली थांबविण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2018 06:07 PM2018-10-01T18:07:58+5:302018-10-01T18:08:23+5:30
मालेगाव तालुक्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. दुष्काळग्रस्त शेतकºयांकडुन सुरु असलेली सक्तीची वीजबील तातडीने थांबवावी अशी मागणी राष्टÑवादी कॉग्रेसचे प्रांतिक सदस्य राजेंद्र भोसले व पदाधिकाºयांनी अप्पर जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे.
मालेगाव : तालुक्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. दुष्काळग्रस्त शेतकºयांकडुन सुरु असलेली सक्तीची वीजबील तातडीने थांबवावी अशी मागणी राष्टÑवादी कॉग्रेसचे प्रांतिक सदस्य राजेंद्र भोसले व पदाधिकाºयांनी अप्पर जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे.तालुक्यात पावसाअभावी खरीप हंगाम वाया जाण्याची चिन्हे दिसत आहेत. शेतातील पिके करपु लागली आहेत. विहिरीची पाणी पातळी खोल गेली आहे.जेमतेम पाण्यावर जनावरांची तहान भागवली जात आहे.शेतकरी दुष्काळाने होरपळत असतांना वीजवितरण कंपनीकडुन सक्तीने कृषी पंपाच्या बिलांची वसुली केली जात आहे. जळालेले रोहित्र बदलुन देण्यासाठी थकीत रक्कम भरण्याची सक्ती केली जात आहे. वीजवितरण कंपनीकडुन आडमुठेपणाचे धोरण राबविले जात आहे.या प्रकारामुळे शेतकºयांची आर्थिक कोंडी होत आहे.अगोदरच अस्मानी- सुलतानी संकटाने शेतकरी पुरता उद्धवस्त होण्याच्या मार्गावर आहे. सध्याच्या गंभीर परिस्थितीचा विचार करुन महावितरणच्या अधिकाºयांनी वीजबिल वसुली थांबवावी, जळालेली रोहित्र नव्याने बसवुन शेतकºयांना सहकार्य करावे अशी मागणी राष्टÑवादी कॉंग्रेसचे भोसले यांच्यासह दिनेश ठाकरे, आनंद कोलते, भगवान माळी,महेश शेरेकर, बाळासाहेब बागुल,अरूण अहिरे, प्रदिप खैरनार, अशोक इंगळे, राजेंद्र पाटिल, कल्पेश छाजेड, निलेश पांिटल, शशिकांत वाघ आदिंनी केली आहे.