घोटी टोल नाक्यावर स्थानिकांना रोजगाराची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2021 11:43 PM2021-11-29T23:43:30+5:302021-11-29T23:43:50+5:30

इगतपुरी : घोटी येथील टोल नाक्यावर इगतपुरी तालुक्यातील बेरोजगारांना कामावर घेण्यात यावे या भाजपा युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या मागणीकडे टोल प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने अखेर सोमवारी (दि. २९) तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. जोपर्यंत स्थानिकांना रोजगार देत नाही तोपर्यंत आमरण उपोषण चालूच ठेवण्याचा पवित्रा भाजपा युवा मोर्चाच्यावतीने घेण्यात आला आहे.

Demand for employment to locals at Ghoti Toll Naka | घोटी टोल नाक्यावर स्थानिकांना रोजगाराची मागणी

घोटी टोल नाक्यावर स्थानिकांना रोजगाराची मागणी

googlenewsNext
ठळक मुद्देतहसील कार्यालयासमोर भाजयुमोचे आमरण उपोषण

इगतपुरी : घोटी येथील टोल नाक्यावर इगतपुरी तालुक्यातील बेरोजगारांना कामावर घेण्यात यावे या भाजपा युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या मागणीकडे टोल प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने अखेर सोमवारी (दि. २९) तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. जोपर्यंत स्थानिकांना रोजगार देत नाही तोपर्यंत आमरण उपोषण चालूच ठेवण्याचा पवित्रा भाजपा युवा मोर्चाच्यावतीने घेण्यात आला आहे.

तालुक्यात अनेक युवा बेरोजगार असून स्थानिकांना डावलून तालुक्यातील कंपन्या व टोल प्लाझा प्रशासन तालुक्याबाहेरील युवकांना रोजगार देत असल्यामुळे तालुक्यात बेरोजगारी व अर्थव्यवस्था कोलमडली आहे. या मागणीसाठी तालुक्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी टोल प्रशासनाला अनेकदा निवेदने दिली. या बाबत टोल प्रशासनाने या विषयी आमदार, तहसीलदार यांच्याशी चर्चा करून स्थानिक युवकांना टोल प्लाझा येथे कामावर घेऊ असे आश्वासन दिले होते. मात्र टोल प्रशासनाने बाहेरून आणलेले कामगार कमी न करता उलट दिवसेंदिवस बाहेरच्या कामगारांची संख्या वाढवत स्थानिक युवकांची दिशाभूल केली जात असल्याने भूमिपुत्रांच्या रोजगारासाठी टोल प्रशासनाने पुढाकार घ्यावा या मागणीसाठी तहसील कार्यालयासमोर अमरण उपोषण सुरू केले आहे.

या प्रसंगी भाजपा युवा जिल्हा उपाध्यक्ष योगेश चांदवडकर, तालुका अध्यक्ष रवींद्र गव्हाणे, ओबीसी आघाडी तालुका अध्यक्ष रवींद्र भागडे, किसान मोर्चा सरचिटणीस बाळू आमले, सज्जन नाठे, भूषण माळी, युवा मोर्चा संघटन सरचिटणीस भाऊसाहेब धोंगडे, आकाश शेलार, महिला आघाडीच्या वैशाली आडके, महिला आघाडी तालुका अध्यक्ष आशा थोरात आदी सहभागी झाले आहेत. 

Web Title: Demand for employment to locals at Ghoti Toll Naka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.