विडी कामगारांना रोजगार देण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2020 11:09 PM2020-05-28T23:09:54+5:302020-05-29T00:10:57+5:30

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या लॉकडाउनमध्ये विडी कामगारांचा रोजगार बुडाला असून, त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. याची दखल घेत केंद्र व राज्य सरकारने तातडीने विडी कामगारांना रोजगार मिळवून द्यावा व विडी विक्री करण्यास परवानगी देण्याची मागणी महाराष्ट्र राज्य विडी कामगार फेडरेशनच्या वतीने करण्यात आली आहे.

Demand for employment of VD workers | विडी कामगारांना रोजगार देण्याची मागणी

विडी कामगारांना रोजगार देण्याची मागणी

googlenewsNext
ठळक मुद्देनिवेदन : उत्पादन विक्रीला परवानगीची मागणी

नाशिक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या लॉकडाउनमध्ये विडी कामगारांचा रोजगार बुडाला असून, त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. याची दखल घेत केंद्र व राज्य सरकारने तातडीने विडी कामगारांना रोजगार मिळवून द्यावा व विडी विक्री करण्यास परवानगी देण्याची मागणी महाराष्ट्र राज्य विडी कामगार फेडरेशनच्या वतीने करण्यात आली आहे.
महाराष्ट्रातील विडी कामगारांच्या कुटुंबीयांची रोजगाराअभावी उपासमार होत असून, राज्य सरकारने त्यांचा प्रश्न सोडवावा, अन्यथा विडी कामगार रस्त्यावर उतरणार असल्याची माहिती फेडरेशनचे राज्याध्यक्ष कारभारी उगले व जनरल सेक्रेटरी शंकर न्यालपेल्ली यांनी दिली.
आॅरेंज व ग्रीन झोनमध्ये उद्योगधंदे व आस्थापना सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र विडी कारखाने सुरू झाले नसल्याने संघटनेने विडीमालकांकडे कारखाने सुरू करून विडी कामगारांना काम देण्यास सांगितले होते. मात्र विडीमालकांनी लॉकडाउन काळात केंद्र व राज्य सरकारने तंबाखू आणि तंबाखूजन्य विडी विक्री करण्यास मनाई केली आहे. सरकारने सदरील मनाई मागे घेतल्याशिवाय कारखाने सुरू करून विडी कामगारांना काम देऊ शकत नसल्याची भूमिका जाहीर केली. यामुळे विडी कामगारांवर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे.
विडी कामगार मागील ५० दिवसापासून कामाअभावी बेरोजगार आहेत. केंद्र व राज्य सरकारकडून विडी कामगारांना कोणतीही आर्थिक मदत देण्यात आलेली नाही.

Web Title: Demand for employment of VD workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.