लॉकडाऊनमधून गटई कामगारांना वगळण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:13 AM2021-04-13T04:13:53+5:302021-04-13T04:13:53+5:30
सिन्नर : लॉकडाऊनमधून गटई कामगारांना वगळण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रीय चर्मकार महासंघातर्फे आमदार माणिकराव कोकाटे यांच्या संपर्क ...
सिन्नर : लॉकडाऊनमधून गटई कामगारांना वगळण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रीय चर्मकार महासंघातर्फे आमदार माणिकराव कोकाटे यांच्या संपर्क कार्यालयात तसेच तहसीलदार राहुल कोताडे, पोलीस निरीक्षक तसेच मुख्याधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे. याबाबत निवेदनही देण्यात आले असून, या निवेदनात म्हटले आहे की, लॉकडाऊनमुळे व्यवसाय बंद केल्याने गटई कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. शासनाचे सर्व नियम पाळून व्यवसाय करण्यास आम्ही बांधिल राहू, असे गटई कामगारांकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे प्रशासनाने गटई कामगारांना लॉकडाऊनमधून वगळावे, अशी मागणी करण्यात आली आहे. या निवेदनावर तालुकाध्यक्ष श्रावण वाघ, युवा शहराध्यक्ष भाऊसाहेब शिलावट, कार्याध्यक्ष सचिन आहेर, उपाध्यक्ष संजय आहिरे, किशोर आहिरे, नरेंद्र आहिरे, बाळू आहिरे, अरुण आहिरे, ताराचंद भदाणे, सुरेश आहिरे, अशोक ठाकरे, शिवाजी ठाकरे, किशोर परमार, राजेंद्र जाधव, ओंकार डावरे, राजू आहिरे आदी कामगारांच्या सह्या आहेत.