इंदिरानगर परिसरात आधार कार्ड केंद्रे वाढविण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 04:10 AM2021-06-21T04:10:48+5:302021-06-21T04:10:48+5:30

नासर्डी ते पाथर्डीदरम्यान भारत नगर, दीपाली नगर, सुचिता नगर, इंदिरा नगर, राजीव नगर, सार्थक नगर, कला नगर परब नगर, ...

Demand for expansion of Aadhar Card Centers in Indiranagar area | इंदिरानगर परिसरात आधार कार्ड केंद्रे वाढविण्याची मागणी

इंदिरानगर परिसरात आधार कार्ड केंद्रे वाढविण्याची मागणी

Next

नासर्डी ते पाथर्डीदरम्यान भारत नगर, दीपाली नगर, सुचिता नगर, इंदिरा नगर, राजीव नगर, सार्थक नगर, कला नगर परब नगर, पांडव नगरी, शरयू नगरी, सराफ नगर, ज्ञानेश्वर नगर, संत नरहरी नगर, दामोदर नगर, पाथर्डी गाव, पाथर्डी फाटा सह विविध उपनगरे आहेत. यामध्ये दिवसागणिक अपार्टमेंट व सोसायट्या वाढत आहेत. त्याचबरोबर वेगाने नागरीकरण होत आहे. लोकवस्तीच्या मानाने परिसरात आधार कार्ड केंद्रांची संख्या अपुरी आहे. लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत प्रत्येकाला आता आधार कार्ड आवश्यक आहे. शैक्षणिक वर्ष सुरू झाल्याने विद्यार्थ्यांना सुद्धा आधार कार्डाची गरज लागते. त्यामुळे आधार कार्ड काढण्यासाठी, पत्ता बदलणे, मोबाईल नंबर बदलणे किंवा लिंक करण्यासाठी प्रत्येकाला पाथर्डी गाव, सिडको महापालिका किंवा शहरात ये-जा करावी लागते. या ठिकाणी जाऊन सुद्धा लांबच लांब रांगा असतात. इंदिरानगर परिसरात आधार कार्ड केंद्रांची संख्या वाढवावी, अशी मागणी त्रस्त नागरिकांनी केली आहे.

Web Title: Demand for expansion of Aadhar Card Centers in Indiranagar area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.