भावड घाट रस्त्याच्या विस्तारीकरणाची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2020 09:52 PM2020-06-07T21:52:22+5:302020-06-08T00:26:37+5:30

भावड घाटाच्या पायथ्याशी असलेल्या वळण रस्त्यावर ट्रॅक्टर उलटल्यामुळे झालेल्या अपघातात चार जणांना आपले प्राण गमवावे लागल्याची घटना शनिवारी घडली. यामुळे रस्त्याच्या विस्तरीकरणाचा मुद्दा ऐरणीवर आला असून, सदरच्या विंचूर-प्रकाशा महामार्गावरील भावडघाट ते माळवाडी या रस्त्याचे तत्काळ विस्तारीकरण करण्याची मागणी वाहनधारकांसह परिसरातील नागरिकांनी केली आहे.

Demand for expansion of Bhavad Ghat road | भावड घाट रस्त्याच्या विस्तारीकरणाची मागणी

भावड घाट रस्त्याच्या विस्तारीकरणाची मागणी

Next
ठळक मुद्देअपघात वाढले : संबंधित विभागाचे दुर्लक्ष; अवजड वाहनांची संख्या वाढली

देवळा : भावड घाटाच्या पायथ्याशी असलेल्या वळण रस्त्यावर ट्रॅक्टर उलटल्यामुळे झालेल्या अपघातात चार जणांना आपले प्राण गमवावे लागल्याची घटना शनिवारी घडली. यामुळे रस्त्याच्या विस्तरीकरणाचा मुद्दा ऐरणीवर आला असून, सदरच्या विंचूर-प्रकाशा महामार्गावरील भावडघाट ते माळवाडी या रस्त्याचे तत्काळ विस्तारीकरण करण्याची मागणी वाहनधारकांसह परिसरातील नागरिकांनी केली आहे.
विंचूर-प्रकाशा मार्गावरून मोठ्या प्रमाणात राज्य व आंतरराज्य वाहतूक सुरू असते. यात अवजड वाहनांचे प्रमाण लक्षणीय आहे. या रस्त्यावर भावडघाट ते माळवाडी दरम्यान कापशी, भावडे, मकरंदवाडी, रामेश्वर, गुंजाळनगर, देवळा व माळवाडी आदी गावे असून, अनेक शाळा रस्त्यालगत आहेत. भावड घाटाकडून देवळ्याकडे तीव्र उतार असल्याने वाहने सुसाट गतीने येतात. यामुळे चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने, तसेच समोरून येणाऱ्या व ओव्हरटेक करताना वाहनाच्या गतीचा अंदाज न आल्यामुळे अनेक अपघात घडतात. त्यातच या रस्त्याची रु ंदी कमी असल्याने वाहनांना ओव्हरटेक करणे धोकादायक ठरते. दुचाकीस्वारांसाठी तर हा रस्ता मृत्यूचा सापळा ठरत असून, सर्वाधिक अपघात दुचाकींचे झाले आहेत. या रस्त्यावर वर्षभरापूर्वी गुंजाळनगर येथील कुणाल गांगुर्डे व भऊर येथील रोशन पवार या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना दुचाकीवरून जात असताना झालेल्या अपघातात जीव गमवावा लागला होता.
विंचूर-प्रकाशा मार्गाचे विस्तारीकरण करून भावड घाट ते माळवाडीपर्यंत दुभाजक टाकल्यास वाहनांना शिस्त लागून अपघातांना आळा बसेल. सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तालुका ग्राहक पंचायतीच्या वतीने या मार्गावर दुभाजक टाकण्याची मागणी केली आहे, परंतु अद्याप कार्यवाही झालेली नाही.
- सचिन आहेर, ग्राहक पंचायत सदस्य, देवळा
भावड घाटापासून देवळ्याकडे असलेल्या तीव्र उताराचा फायदा घेण्यासाठी वाहन न्यूट्रल करून बंद करत डिझेल वाचवण्याची काही बेफिकीर वाहनचालकांची प्रवृत्ती अपघातांना आमंत्रण देणारी ठरते. तसेच वेगमर्यादेचे उल्लंघन करीत वेगाने येणाºया वाहनांच्या गतीवर अंकुश लावण्याची आवश्यकता आहे. घाटाच्या पायथ्याशी असलेल्या वळण रस्त्यावर घाटातून येणाºया वाहनांची गती कमी करण्यासाठी योग्य उपाययोजना करण्याची व रस्त्याचे विस्तारीकरण करण्याची आवश्यकता आहे.
- चंद्रकांत भदाणे, शेतकरी, कापशी

Web Title: Demand for expansion of Bhavad Ghat road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.