कर विवरणपत्रासाठी मुदतवाढीची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 12:10 AM2021-04-27T00:10:03+5:302021-04-27T00:10:30+5:30
मालेगाव कॅम्प : मालेगावी आयकर भरणे, विवरणपत्र दाखल करण्यासह इतर संलग्न कामांसाठी निर्बंधांच्या कालावधीत मुदतवाढाची मागणी येथील कर सल्लागार असोसिएशनतर्फे कृषिमंत्री दादा भुसे यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

असोसिएशनच्या निवेदनात म्हटले आहे की, कडक निर्बंधाच्या कालावधीत सनदी लेखापाल (सी ए), करसल्लागार यांची कार्यालये सुरू ठेवण्यासाठी परवानगी देण्यात आलेली नाही. त्यामुळे व्हॅट, व्यवसाय कर, जीएसटी कायद्यान्वये मुदतीत दाखल करावयाची विवरणपत्रे व कर भरणा करू शकत नाही. सदरील महत्त्वाचे करभरणा हे शासनास महसूलसंदर्भातील आवश्यक बाब आहे. म्हणून यांची कार्यालये सुरू ठेवण्यासाठी मागणीदेखील करण्यात आली होती. परंतु परवानगी देण्यात आली नाही. त्यामुळे सर्व आर्थिक करांच्या उलाढालीसाठी अडचणी निर्माण होत आहे. त्यामुळे असोसिएशनच्या मागणीचा वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करावा, असे असोसिएशनचे अध्यक्ष सतीश कजवाडकर, उपाध्यक्ष बालचंद छाजेड, सचिव राकेश डिडवाणिया, मुकेश जनानी आदी सदस्यांनी म्हटले आहे.