शेतकऱ्यांची वीजबिले माफ करण्याची मागणी

By admin | Published: March 12, 2016 11:35 PM2016-03-12T23:35:49+5:302016-03-12T23:43:39+5:30

शेतकऱ्यांची वीजबिले माफ करण्याची मागणी

Demand for farmers' electricity bills | शेतकऱ्यांची वीजबिले माफ करण्याची मागणी

शेतकऱ्यांची वीजबिले माफ करण्याची मागणी

Next

 नाशिक : भीषण दुष्काळी परिस्थितीत अवकाळी पाऊस व गारपिटीने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची वीजबिले माफ करण्यात यावी, अशी मागणी नांदूर मानूर शिवारातील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनाच्या माध्यमातून केली आहे.
महावितरण कंपनीने ३ एचपी क्षमतेचा विद्युतपंप वापरणाऱ्या शेतकऱ्यांना ५ एचपी क्षमतेच्या विद्युतपंपाचे बिल दिले आहे. तसेच कृषी संजीवनी योजनेअंतर्गत निम्मे वीज बिल मुदतीत भरूनही मागील रक्कम थकबाकीत दाखविण्यात येत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. भरमसाठ व्याज व आकारणी होत असून, दुष्काळी परिस्थिती असून विहिरींनाही पाणी नाही. अशा स्थितीत विद्युतपंपांना मीटर बसवलेले असताना महावितरणकडून मनमानी पद्धतीने वीज बिल आकारणी होत असल्याचे या निवेदनात अधोरेखित करण्यात आले आहे. याप्रसंगी नगरसेवक उद्धव निमसे, शांताराम माळोदे, विश्राम माळोदे, छगन माळोदे मधुकर हांबरे उपस्थित होते.

Web Title: Demand for farmers' electricity bills

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.