सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2018 12:16 AM2018-05-13T00:16:33+5:302018-05-13T00:16:33+5:30

भर रस्त्यातील वाकडे- तिकडे लावलेले बॅरिकेडिंग पोलिसांनी तसेच ठेवल्याने सुनील मटाले या शिक्षकाचा अपघात होऊन मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (दि़८) रात्रीच्या सुमारास चोपडा लॉन्ससमोर घडली होती़ पोलीस कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणाचे बळी ठरलेल्या मटाले यांच्या कुटुंबीयांनी संबंधित पोलीस अधिकारी व कर्मचाºयांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली असून, पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांना निवेदन देणार आहे

 The demand for filing a criminal complaint | सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

Next

नाशिक : भर रस्त्यातील वाकडे- तिकडे लावलेले बॅरिकेडिंग पोलिसांनी तसेच ठेवल्याने सुनील मटाले या शिक्षकाचा अपघात होऊन मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (दि़८) रात्रीच्या सुमारास चोपडा लॉन्ससमोर घडली होती़ पोलीस कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणाचे बळी ठरलेल्या मटाले यांच्या कुटुंबीयांनी संबंधित पोलीस अधिकारी व कर्मचाºयांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली असून, पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांना निवेदन देणार आहे  व्ही. एन. नाईक महाविद्यालयात आयटीआय शिक्षक म्हणून कार्यरत असलेले सुनील मटाले हे पोलिसांच्या बेजबाबदार व हलगर्जीपणाचा बळी ठरले आहेत़ मंगळवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास विवाह समारंभ आटोपून यामाहा दुचाकीने (एमएच १५, बीए ६२८२) हनुमानवाडीतील आपल्या घराकडे परतत होते़ रात्रीच्या अंधारात चोपडा लॉन्ससमोर पोलिसांनी भर रस्त्यात लावलेल्या बॅरिकेडिंगचा मटाले यांना अंदाज न आल्याने ते थेट त्यावर जाऊन आदळले. एका बॅरिकेडचा पत्रा मटाले यांच्या डोक्यात शिरल्याने ते गंभीर जखमी झाले यात त्यांचा मृत्यू झाला़  सरकारवाडा पोलिसांनी मटाले यांचा अपघाताबाबत दाखल केलेल्या गुन्ह्यात रस्ते दुभाजकाला दुचाकी आदळून अपघात झाल्याची नोंद केली आहे़ मात्र, प्रत्यक्षात रस्त्यावरील बॅरिकेडिंगला धडकून मटाले यांचा मृत्यू झाल्याचे फोटोही नातेवाइकांनी ‘लोकमत’कडे पाठविले आहेत़ पोलिसांनी स्वत:चा बचाव करण्यासाठी चुकीचा गुन्हा नोंदविण्याबरोबरच रात्रीतून बॅरिकेडिंग हटविले़  तसेच अपघातस्थळाहून पंचनामा न करताच मटाले यांची दुचाकी पोलीस ठाण्यात नेली़ कर्तव्यात कसूर करणाºया पोलीस कर्मचाºयांविरोधात पोलीस आयुक्तांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी मटाले यांच्या कुटुंबीय  व नातेवाइकांनी निवेदनाद्वारे केली आहे़
मटाले यांचा मृत्यू दुभाजकावर आदळून नव्हे तर पोलिसांनी रस्त्यावर ठेवलेल्या बॅरिकेड्समुळे झाला आहे़ मात्र, अपघातानंतर रात्रीच ते घटनास्थळावरून उचलून नेण्यात आले़ तसेच एरवी अपघातानंतर घटनास्थळी पंचनामा करणाºया पोलिसांनी मात्र तत्परता दाखवत दुचाकी आणि बॅरिकेड्स दोन्ही उचलून नेले़ कर्तव्यात कसूर करणाºया संबंधित पोलीस कर्मचाºयांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यासाठी निवेदन देणार आहोत़  - किशोर सिरसाट ,  मटाले यांचे नातेवाईक

Web Title:  The demand for filing a criminal complaint

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.