येवल्याच्या पश्चिम भागातील बंधारे भरण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2018 01:39 AM2018-03-13T01:39:38+5:302018-03-13T01:39:38+5:30
तालुक्याच्या पश्चिम भागातील बंधारे पालखेडच्या आवर्तनातून भरून देण्याची मागणी भाजपा महिला आघाडीने एका निवेदनाद्वारे पालखेड पाटबंधारे विभागाचे सहायक अभियंत्यांकडे केली आहे.
येवला : तालुक्याच्या पश्चिम भागातील बंधारे पालखेडच्या आवर्तनातून भरून देण्याची मागणी भाजपा महिला आघाडीने एका निवेदनाद्वारे पालखेड पाटबंधारे विभागाचे सहायक अभियंत्यांकडे केली आहे. येवला तालुक्यात यंदा पाऊस कमी झाल्याने मागील महिन्यापासून पाणीटंचाईची झळ बसू लागली आहे. तालुक्यात काही ठिकाणी नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. सध्या तालुक्यात पालखेडचे पाणी आवर्तन सुरू असून, वितरिका क्रमांक ३४, ३५, ३६ च्या लगत असलेले साठवण बंधारे या आवर्तनाच्या पाण्याने भरले तर परिसरातील गावांमध्ये पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या पाण्याचीदेखील व्यवस्था होईल. सध्या परिसरात पाणीप्रश्न गंभीर होत असून, बंधारे भरल्यास परिसरातील नागरिकांना काहीसा दिलासा मिळणार असून हे बंधारे पालखेडच्या आवर्तनातून भरून द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदनावर येवला तालुका भाजपा महिला आघाडीच्या अध्यक्ष प्रियंका मिटके, सरचिटणीस प्रतीक्षा चव्हाण, भाटगावच्या सरपंच छायाबाई चव्हाण यांच्यासह अरु ण मिटके, अर्जुन मिटके, दावल जाधव यांच्यासह ग्रामस्थांच्या स्वाक्षºया आहेत.