येवला तालुक्यातील बंधारे भरण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2019 04:51 PM2019-07-31T16:51:56+5:302019-07-31T16:52:13+5:30

पालकमंत्र्यांना निवेदन : पाणीप्रश्नी चर्चा

Demand for filling of dams in Yeola taluka | येवला तालुक्यातील बंधारे भरण्याची मागणी

येवला तालुक्यातील बंधारे भरण्याची मागणी

Next
ठळक मुद्देअजूनही शंभरहून अधिक गावांना टॅँकरने पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे.

येवला : पालखेड धरण समूहातून पालखेड डाव्या कालव्यात येणाऱ्या पूर पाण्यातून येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघातील बंधारे भरून देण्याची मागणी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
सध्या पावसाने जोर धरला असला तरीही येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघात अत्यल्प पाऊस असून अजूनही शंभरहून अधिक गावांना टॅँकरने पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची परिस्थिती अतिशय दयनीय आहे. पालखेड धरणातून पाणी सोडले असून सदर पाण्याने येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघातील लाभक्षेत्रातील बंधारे भरून दिल्यास लोकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागेल. पिण्याच्या पाण्यासाठी होणारी भटकंती कमी होईल. पूर पाण्याने लाभक्षेत्रातील सर्व बंधारे भरून द्यावेत अशी मागणी महाजन यांच्याकडे करण्यात आली. यावेळी शिवसेनेचे संभाजी पवार, निफाड पंचायत समिती सभापती सोमनाथ पानगव्हाणे, लासलगाव तालुकाध्यक्ष प्रकाश पाटील, बापू गायकवाड आदी उपस्थित होते.

Web Title: Demand for filling of dams in Yeola taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.