ओझर येथील खड्डे बुजविण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2020 04:16 PM2020-08-24T16:16:24+5:302020-08-24T16:16:32+5:30

ओझर : दर पावसाळ्यात परिसरातील सर्व्हिस रोडवर निर्माण होणाऱ्या खड्ड्यांमुळे अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे. तीन दिवसात खड्डे न बुजवल्यास टोल नाका बंद करण्याचा इशारा युवा सेनेने निवेदनाद्वारे दिला आहे.

Demand for filling the pits at Ozar | ओझर येथील खड्डे बुजविण्याची मागणी

ओझर येथील खड्डे बुजविण्याची मागणी

googlenewsNext

ओझर : दर पावसाळ्यात परिसरातील सर्व्हिस रोडवर निर्माण होणाऱ्या खड्ड्यांमुळे अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे. तीन दिवसात खड्डे न बुजवल्यास टोल नाका बंद करण्याचा इशारा युवा सेनेने निवेदनाद्वारे दिला आहे.
युवा सेनेचे तालुकाप्रमुख आशिष शिंदे यांच्यासह गावातील पदाधिकाऱ्यांनी महामार्ग प्रकल्प अभियंता सागर देशमुख यांना निवेदन दिले. ओझर येथे उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याने सर्व वाहतूक सर्व्हिस रोडवरून सुरू आहे. अवजड वाहनांची वर्दळ वाढल्याने रस्ता उखडून गेला आहे. त्यामुळे अपघात होत आहेत. दुचाकी तसेच छोट्या वाहनधारकांना या खड्ड्यांतून मार्ग काढताना कसरत करावी लागत आहे. रस्ता दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याने अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. सर्व्हिस रोडचे नव्याने मजबुतीकरण करून डांबरीकरण करावे, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी माजी उपसरपंच प्रकाश महाले, कामेश शिंदे, प्रशांत पगार, गुणेंद्र तांबट, विशाल मालसाने,पिंटू शिंदे आदी उपस्थित होते.
---------------------
ओझरजवळ उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याने सर्व्हिस रोडने वाहतूक सुरू आहे. काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने सर्वत्र मोठे खड्डे पडले आहेत. गावकºयांसाठी ही बाब अतिशय धोक्याची आहे. त्यामुळे अनेक बळी गेले आहेत. तीन दिवसात खड्डे न बुजवल्यास भरमसाठ टोल वसुली करणाºया टोल नाक्यावर आंदोलन करून तो बंद पाडण्यात येईल.
- आशिष बाळासाहेब शिंदे, तालुकाप्रमुख,युवा सेना, निफाड

Web Title: Demand for filling the pits at Ozar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक