जानोरी परिसरातील रस्त्यांचे खड्डे बुजविण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 06:55 PM2021-01-20T18:55:44+5:302021-01-20T18:56:25+5:30

जानोरी : दिंडोरी तालुक्यातील जानोरी, आंबे दिंडोरी, शिवनई, वरवंडी, म्हसरूळ या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने वाहतूक करण्यास अडचण येत असून अपघातालाही सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे सदर खड्डे तत्काळ बुजविण्यात यावेत, अशी मागणी भाजपचे दिंडोरी तालुका सरचिटणीस योगेश तिडके, शरद घुमरे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे निवेदनाद्वारे केली आहे.

Demand for filling of potholes in Janori area | जानोरी परिसरातील रस्त्यांचे खड्डे बुजविण्याची मागणी

जानोरी परिसरातील रस्त्यांचे खड्डे बुजविण्याची मागणी

Next
ठळक मुद्देवाहतूक करण्यास अडचण

जानोरी : दिंडोरी तालुक्यातील जानोरी, आंबे दिंडोरी, शिवनई, वरवंडी, म्हसरूळ या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने वाहतूक करण्यास अडचण येत असून अपघातालाही सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे सदर खड्डे तत्काळ बुजविण्यात यावेत, अशी मागणी भाजपचे दिंडोरी तालुका सरचिटणीस योगेश तिडके, शरद घुमरे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे निवेदनाद्वारे केली आहे.

जानोरी ते वरवंडी या राज्यमार्गावरून शेतकरी आपला शेतमाल मोठ्या प्रमाणात नाशिकच्या भाजीपाला मार्केटला घेऊन जातात. तसेच नाशिक विमानतळाकडेही वाहतुकीचे प्रमाण अधिक होत असते. परंतु, सदर रस्त्यावर या वर्षीच्या पावसाने मोठ्या प्रमाणात खड्डे निर्माण झाल्यामुळे वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे. तसेच अनेक वेळा वाहनधारकांना अपघातालाही सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने जानोरी, आंबे दिंडोरी, वरवंडी, शिवनई या रस्त्यांचे खड्डे लवकरात लवकर दुरुस्त करावेत, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनाची प्रत सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपकार्यकारी अभियंता किरण पवार यांना देण्यात आली.

Web Title: Demand for filling of potholes in Janori area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.