सलून चालक, मालक यांना आर्थिक मदत देण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:15 AM2021-04-28T04:15:30+5:302021-04-28T04:15:30+5:30
मागील वर्षापासून सलून व्यवसाय डबघाईला आला असून, आता लॉकडाऊनमुळे नाभिक समाज आर्थिक अडचणीत सापडला आहे. मागील वर्षी लॉकडाऊनमुळे आर्थिक ...
मागील वर्षापासून सलून व्यवसाय डबघाईला आला असून, आता लॉकडाऊनमुळे नाभिक समाज आर्थिक अडचणीत सापडला आहे. मागील वर्षी लॉकडाऊनमुळे आर्थिक अडचणींमुळे १७ समाज बांधवांनी आत्महत्या केली. त्यांच्या कुटुंबीयांना शासनाने कुठलीही मदत केली नाही. या वेळी तरी मदत मिळेल असे वाटले होते; पण आजपर्यंत शासनाने नाभिक समाजासाठी कुठलीही मदत केली नाही. त्यामुळे कुटुंबाचा चरितार्थ चालविणे अवघड झाले आहे. तरी शासनाने सलून दुकान सुरू करण्यास परवानगी द्यावी व सलून व्यावसायिकांना आर्थिक पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी राष्ट्रीय नाभिक एकता महासंघाच्या वतीने महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष संजय वाघ, रमेश बिडवे, केशव बिडवे, महेंद्र कानडी, बाळासाहेब साळुंके, माधव शिंदे, राजेंद्र बिडवे, संदीप व्यवहारे, वाल्मिक शिंदे, राजू तुपे, केशव पंडित आदींसह नाभिक बांधवांनी केली आहे.