मंडप व्यावसायिकांकडून आर्थिक पॅकेजची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2020 09:14 PM2020-05-23T21:14:56+5:302020-05-24T00:27:52+5:30
सटाणा :कोरोना महामारीमुळे एकत्र येण्यावर किंवा सभा -समारंभावर सरकारने बंदी आणल्याने मंडप व्यवसाय संकटात सापडला असून, या कामावरील मजूरवर्गाला कुटुंबीयांसह उपासमारीचा सामना करावा लागत आहे.
सटाणा :कोरोना महामारीमुळे एकत्र येण्यावर किंवा सभा -समारंभावर सरकारने बंदी आणल्याने मंडप व्यवसाय संकटात सापडला असून, या कामावरील मजूरवर्गाला कुटुंबीयांसह उपासमारीचा सामना करावा लागत आहे. शासनाच्या वतीने मंडप व्यावसायिकांना आर्थिक मदत मिळावी, या आशयाच्या मागणीचे निवेदन बागलाण तालुका मंडप असोसिएशनच्या वतीने तहसीलदार जितेंद्र इंगळे-पाटील यांना देण्यात आले.
या व्यवसायावर मजूरवर्ग आणि त्यांच्या कुटुंबीयांचा उदरिनर्वाह अवलंबून असतो. गेल्या दोन महिन्यांपासून देशासह राज्यात कोरोना महामारीच्या साथीच्या आजारावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून लोकांच्या एकत्रित येण्यास किवा सभा-समारंभास शासनाच्या वतीने मनाई करण्यात आली आहे. यामुळे या व्यवसायावर अबलंबून असणाऱ्या घटकाला उपासमारीचा सामना करावा लागत आहे. यावेळी नदिम तांबोळी, मंगेश भावसार, समीर तांबोळी, गणेश बागड, आशपाक तांबोळी, किशोर मोरे, जाकीर तांबोळी, कालू मन्सुरी, शेखलाल मन्सुरी आदी व्यावसायिक व मजूर उपस्थित होते.