बारा बलुतेदारांना आर्थिक पॅकेज देण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 12:17 AM2021-04-27T00:17:13+5:302021-04-27T00:17:55+5:30
कसबे सुकेणे : कोरोना जागतिक महामारीमुळे हातावर पोट भरणाऱ्या राज्यातील बारा बलुतेदारांना राज्य शासनाने त्वरित आर्थिक मदतीचे पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी निफाड तालुका भाजपच्या वतीने एका निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे.

निवेदनात म्हटले आहे, राज्यात कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता, निर्बंध जाहीर करण्यात आले. त्यामध्ये जीवनावश्यक वस्तुंची दुकाने सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आलेली आहे, परंतु नाभिक, सुतार, कुंभार, शिंपी, परीट, यांच्यासह बारा बलुतेदारांमधील छोट्या व्यावसायिकांचा परंपरागत व्यवसाय पूर्णतः बंद आहे. आधीच गरीब परिस्थितीत असलेला हा समाज निर्बंधांमुळे अधिक आर्थिक अडचणीत आलेला आहे. शासनाने निर्बंध जाहीर करताना ऑटोरिक्षा चालक, बांधकाम मजूर, फेरीवाले आदींना आर्थिक साहाय्य जाहीर केले, परंतु बारा बलुतेदारांसाठी कुठलेही आर्थिक साहाय्य जाहीर केले नाही.
राज्यातील बारा बलुतेदारांबाबत सहानुभूतीपूर्वक विचार करून, या परंपरागत व्यावसायिकांना प्रति कुटुंब किमान ५,००० रुपये आर्थिक साहाय्य करावे, अशी मागणीही भाजपचे प्रदेश सरचिटणीस शंकर वाघ, असलम शेख, संजय शेवाळे, केशव सुरवाडे, कैलास शिंदे यांनी निफाडच्या प्रांताधिकारी डॉ.अर्चना पाठारे यांचेकडे निवेदनाद्वारे केली आहे.