रब्बी हंगामासाठी पालखेड कालव्याचे आवर्तन निश्चित करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2019 07:31 PM2019-11-20T19:31:38+5:302019-11-20T19:31:56+5:30

येवला : यंदाच्या रब्बी हंगामात शेतकऱ्यांना पिक नियोजनासाठी पालखेड डाव्या कालव्याच्या रब्बी आवर्तनाचे पाणी वाटप शेतीसाठी आवर्तन संख्या व कालावधी निश्चित करण्याची मागणी येथील शेतकऱ्यांनी एका निवेदनाद्वारे नाशिक जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.

Demand for fixation of Palkhed canal for Rabi season | रब्बी हंगामासाठी पालखेड कालव्याचे आवर्तन निश्चित करण्याची मागणी

रब्बी हंगामासाठी पालखेड कालव्याचे आवर्तन निश्चित करण्याची मागणी

Next
ठळक मुद्देशेतकºयांना रब्बी हंगामातील पिक नियोजन करता येणार आहे.

येवला : यंदाच्या रब्बी हंगामात शेतकऱ्यांना पिक नियोजनासाठी पालखेड डाव्या कालव्याच्या रब्बी आवर्तनाचे पाणी वाटप शेतीसाठी आवर्तन संख्या व कालावधी निश्चित करण्याची मागणी येथील शेतकऱ्यांनी एका निवेदनाद्वारे नाशिक जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.
यंदा पालखेड धरण समूहक्षेत्रात जोरदार पाऊस झाला असून चांगला पाणीसाठा आहे. त्यामुळे पालखेड डाव्या कालव्याचे रब्बी हंगामाच्या पाणी आवर्तनाचे पाणी वाटप तसेंच शेतीसाठी आवर्तन संख्या व कालवधी निश्चित करावे. जेणेकरून शेतकºयांना रब्बी हंगामातील पिक नियोजन करता येणार आहे.
चारी क्र मांक ४६ ते ५२ देखील पाणी आवर्तन देण्यात यावे. तसेच येवला शहरासह ३८ गाव पाणी पाणीपुरवठा योजनेचे देखील पाण्याचे नियोजन करता येईल. शेतीसाठी पाणी किती मिळणार याची शेतकºयांना माहिती मिळाल्यास पिक नियोजन करता येईल.
त्यामुळे पालखेड डाव्या कालव्याच्या रब्बी आवर्तनाचे पाणी वाटप शेतीसाठी आवर्तन संख्या व कालावधी लवकरात लवकर निश्चित करावा अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनावर शिवसेनेचे संभाजी पवार यांच्यासह शेतकºयांच्या स्वाक्षºया आहे.
 
Web Title: Demand for fixation of Palkhed canal for Rabi season

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.