पाझर तलाव पूरपाण्याने भरून देण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2020 10:20 PM2020-09-21T22:20:37+5:302020-09-22T00:56:12+5:30

पिंपळगाव वाखारी : परिसरात यंदा खरिपाच्या पिकांना अनुकूल पाऊस झाला असला तरी जोरदार पावसाअभावी परिसरातील वाखारी, खुंटेवाडी, वाखारवाडी, कोलदर भागातील पाझर तलाव अद्याप कोरडे आहेत. चणकापूर उजवा कालव्याच्या पूरपाण्याने हे पाझर तलाव भरून द्यावीत, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

Demand for flooding of seepage ponds | पाझर तलाव पूरपाण्याने भरून देण्याची मागणी

पाझर तलाव पूरपाण्याने भरून देण्याची मागणी

googlenewsNext
ठळक मुद्देउन्हाळ्यात पाणीटंचाईचे संकट निर्माण होण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त

पिंपळगाव वाखारी : परिसरात यंदा खरिपाच्या पिकांना अनुकूल पाऊस झाला असला तरी जोरदार पावसाअभावी परिसरातील वाखारी, खुंटेवाडी, वाखारवाडी, कोलदर भागातील पाझर तलाव अद्याप कोरडे आहेत. चणकापूर उजवा कालव्याच्या पूरपाण्याने हे पाझर तलाव भरून द्यावीत, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
परिसरातील पाझर तलाव पुरेशा पावसाअभावी कोरडे असून, परिसरात पावसाची प्रतीक्षा कायम आहे. यंदा झालेला पाऊस खरीप मका पिकाला अनुकूल ठरला असल्याने फक्त मक्याचे पीक जोरदार आहे.
रब्बीतील उन्हाळ कांद्याच्या लागवडीसाठी जमिनीत पुरेसा जलसाठा होण्यासाठी कोरडे असलेले पाझर तलाव चणकापूर उजवा कालव्याच्या पूरपाण्याने भरण्याची गरज आहे. समाधानकारक पाऊस झाला नाही तर उन्हाळ्यात पाणीटंचाईचे संकट निर्माण होण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे. भविष्यातील पाणीटंचाईचे संकट दूर होण्यासाठी चणकापूरच्या पूरपाण्याने पाझर तलाव भरण्याची मागणी जेर धरू लागली आहे. शेतकरी करत आहेत.

Web Title: Demand for flooding of seepage ponds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.