दुशिंगपूर पाझर तलावात उड्डाणपुल उभारण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2019 05:40 PM2019-01-03T17:40:08+5:302019-01-03T17:40:42+5:30
सिन्नर तालुक्यातील दुशिंगपूर येथील ५० दशलक्ष घनफूट क्षमतेच्या पाझर तलावाच्या माध्यमातून समृध्दी महामार्ग प्रस्तावित आहे. यातील केवळ १०० मीटर नदीच्या प्रवाहाची जागा सोडून उर्वरित ठिकाणी भरावा टाकून रस्ता बणविण्याचे काम सबंधित ठेकेदाराने सुरू केले आहे. मात्र, त्यातून पाझर तलावाच्या साठवण क्षमता कमी होऊन तलावाचे अस्तित्त्वच धोक्यात येण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
अगोदरच दुष्काळी असणाऱ्या भागातील शेतकºयांचे कायमस्वरूपी नुकसान होणार आहे. त्यामुळे सबंधित विभागाने संपूर्ण बंधाºयातून १ किलोमीटरचा उड्डाणपूल उभारावा, अन्यथा महामार्गाचे काम होवू देणार नाही, असा आक्रमक पवित्रा येथील ग्रामस्थांनी घेतला असून याबाबतचे निवेदन जिल्हाधिका-यांना देण्यात आले आहे. या कामासाठी समृद्धी महामार्गाच्या अधिकाºयांनी पाटबंधारे विभागाची परवानगीही घेतली नसल्याचा आरोप दुशिंगपूर ग्रामस्थांनी निवेदनात केला आहे. सदर कामच बेकायदेशीर असल्याचा आक्षेप निवेदनात घेतला आहे. यासंदर्भात तहसीलदार नितीन गवळी, उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांना शिष्ठमंडळाने निवेदन देत वस्तुूस्थितीची जाणीव करून दिली. शिष्टमंडळाने दुशिंगपूरचे उपसरपंच कानिफनाथ घोटेकर, भास्कर कहांडळ, कानिफनाथ काळे, डॉ. विजय शिंदे यांच्यासह शेतकºयांचा समावेश होता. समृद्धी महामार्ग बंधा-याच्या माध्यमातूनच जात असल्याने येथे उड्डाणपुल न बांधल्यास पाणी साठा कमी होणार आहे. शिवाय बंधा-याच्या बॅकवॉटर परिसरातील रहिवाशांनाही त्याचा त्रास सहन करावा लागणार आहे. त्यामुळे येथील शेतकरी आक्रमक झाले आहेत. तहसीलदार गवळी यांनी समृद्धीचे काम करणा-या ठेकेदार कंपनीच्या अधिका-यांना बोलावून याबाबत समज दिली. दरम्यान दुशिंपूर तलावातून उड्डाणपूल न झाल्यास समृद्धी महामार्गाचे काम होवूच देणार नाही, असा आक्रमक पवित्रा ग्रामस्थांनी घेतला आहे.