विंचूरसह परिसरात चारा छावणी सुरु करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2019 06:04 PM2019-05-10T18:04:17+5:302019-05-10T18:04:39+5:30

विंचूर: परिसरात कमी पावसामुळे जनावरांच्या चाऱ्याची टंचाई निर्माण झाली असल्याने जनावरांसाठी चारा छावणी तसेच पाण्याची व्यवस्था करावी अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी प्रांत अधिकारी तसेच तहसिलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे .

 Demand for fodder camp in the area along with Vinchur | विंचूरसह परिसरात चारा छावणी सुरु करण्याची मागणी

विंचूरसह परिसरात चारा छावणी सुरु करण्याची मागणी

Next

खरीप हंगामामध्ये विंचूर व परिसरात अल्प पाऊस झाल्याने जनावरांच्या चाºयाची कमतरता भासत आहे. विंचूरमध्ये पाच दूध संकलन केंद्र असून दररोज तेरा ते पंधरा हजार लिटर दूध पंचक्र ोशितील शेतकरी व दुग्ध व्यावसायिकांकडून केली जाते. बहुतांश कुटुंब ही दुग्ध व्यवसायावर उदरनिर्वाह करीत आहेत. पाण्याची पातळीही खोल गेली असल्याने दूध उत्पादक शेतक-यांची चा-याअभावी वणवण होत आहे. सदर बाब चार-पाच दिवसांपूर्वी दुष्काळी दौºयावर आलेले पालक मंत्री गिरीश महाजन यांच्या निदर्शनास आणून दिली होती. त्यावेळी पालकमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनानुसार परिसरातील उपलब्ध असणा-या जनावरांच्या चा-याची छावणी लवकर सुरु करावी असे निवेदनात म्हटले आहे.
यावेळी पंचायत समिती सदस्य संजय शेवाळे, भाजपाचे तालुका अध्यक्ष संजय वाबळे, माजी सरपंच मधुकर दरेकर, विष्णुनगरचे सरपंच किशोर मवाळ, तलाठी सागर शिर्केआदी उपस्थित होते.

Web Title:  Demand for fodder camp in the area along with Vinchur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी