राजापूर येथे चारा टंचाई छावण्या सुरू करण्याची मागणी.....
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2019 07:48 PM2019-02-12T19:48:20+5:302019-02-12T19:48:36+5:30
राजापूर : येवला तालुक्यातील राजापूर व परिसरात यावर्षी फेब्रुवारी महिन्यापासून दुष्काळी परिस्थितीत भयाण होत चालली आहे. जनावरांचा चारा टंचाई, पिण्यासाठी पाणी, शेतकरी व मजूरांना कामे नसल्याने दुष्काळी परिस्थितीची दाहकता हि दिवसेंदिवस वाढत चालली आहे या करीता राजापुर येथे चारा टंचाई छावण्या सुरु कराव्यात अशी मागणी करण्यात आली आहे.
राजापूर : येवला तालुक्यातील राजापूर व परिसरात यावर्षी फेब्रुवारी महिन्यापासून दुष्काळी परिस्थितीत भयाण होत चालली आहे. जनावरांचा चारा टंचाई, पिण्यासाठी पाणी, शेतकरी व मजूरांना कामे नसल्याने दुष्काळी परिस्थितीची दाहकता हि दिवसेंदिवस वाढत चालली आहे या करीता राजापुर येथे चारा टंचाई छावण्या सुरु कराव्यात अशी मागणी करण्यात आली आहे.
शासनाने जनावरांना चारा छावण्या व पिण्यासाठी पाणी व शेतकरी व गोरगरिबांना दुष्काळी कामे नसल्याने शेतकरी व मंजूरावर उपासमारीची वेळ आली आहे. राजापूर हे डोंगराळ भागात असल्याने येथे शेतकºर्याकडे असा तसा पंधरा दिवसच चारा पूरेल इतकाच चारा शेतकर्याकडे शिल्लक आहे. पंधरा दिवसांनंतर जनावरांना कोठून चारा आणावा या विचाराने शेतकरी हवालिदल झाले आहे. जनावरांना पाच ते सहा महिने कसे सांभाळावे विकत चारा आणण्यासाठी शेतकऱ्याकडे पैसे नाहीत.
दुष्काळ हा येथे दरवर्षी पाचवीलाच पूजलेला आहे. राजापूर येथील जनता चारा टंचाईने जनता हैराण झाली आहे. पहिलाच शेतकºयांवर कर्जाचा डोंगर असताना आता दुष्काळात शेतकºयांवर कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे. राजापूर व पूवेंकडील भागात दुष्काळाची चिन्हे गडद होऊन लागली आहे. दररोज टँकर येतात मात्र ते पूरत नाही त्यामुळे पशूधन कसे सांभाळावे या संकटात शेतकरी सापडले आहे.
अजून पाच ते सहा महिने कसे काढावे या विचाराने शेतकरी चिंता करीत आहे. आतापासूनच उन्हाळ्याच्या झळा राजापूर येथील जनेतेला सोसाव्या लागत आहे. शेतकºयांनी केलेला खर्चही वसूल झालेला नसल्याने शेतकºयांनी आपला उदरनिर्वाह कसा करावा, मुलांचे शिक्षण या विवंचनेबरोबरच जनावरांचा चारा टंचाईचा बिकट प्रश्न निर्माण झाली आहे.
पिण्यासाठी पाणी या संकटाचा सामना करावा लागत आहे. विहीरींनी तळ गाठला आहे. राजापूर येथील वाड्या-वस्तीवर पिण्यासाठी पाणी टंचाई हि भयानक स्थिती निर्माण झालेली आहे. राजापूर येथे लवकरच चारा छावण्या सुरू कराव्यात दुष्काळी कामे सूरू करावे अशी मागणी शंकर अलगट, समाधान चव्हाण, अशोक आव्हाड, लक्ष्मण घूगे, गोकुळ वाघ, भारत वाघ, सुभाष अलगट, सागर अलगट, संतोष भाबड, बबन अलगट आदींनी केली आहे.
(फोटो पाठवणार आहे)