‘फोर के टीव्ही’ला मागणी वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2017 12:14 AM2017-09-23T00:14:45+5:302017-09-23T00:14:51+5:30
संपत्तिदायिनी महालक्ष्मीच्या विविध रूपांचा नवरात्रोत्सव आणि तेजोमय दिवाळीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक्स कंपन्या सरसावल्या असून, मोबाइलपासून एलईडी टीव्हीपर्यंतचे नवनवीन मॉडेल्स खास दिवाळीनिमित्त लाँच करण्यात आले आहेत. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक्स कंपन्यांनी धमाकेदार आॅफर्स जाहीर केल्या असून, फ्रीज, वॉशिंग मशीन, एलईडी टीव्हीला सर्वाधिक मागणी आहे.
नाशिक : संपत्तिदायिनी महालक्ष्मीच्या विविध रूपांचा नवरात्रोत्सव आणि तेजोमय दिवाळीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक्स कंपन्या सरसावल्या असून, मोबाइलपासून एलईडी टीव्हीपर्यंतचे नवनवीन मॉडेल्स खास दिवाळीनिमित्त लाँच करण्यात आले आहेत. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक्स कंपन्यांनी धमाकेदार आॅफर्स जाहीर केल्या असून, फ्रीज, वॉशिंग मशीन, एलईडी टीव्हीला सर्वाधिक मागणी आहे. नवरात्रोत्सव आणि दिवाळीत घरात काहीतरी नवीन वस्तू खरेदी करून आनंद द्विगुणित करण्याची पद्धत रूळल्याने ग्राहकांच्या आवडी-निवडी व गरजा लक्षात घेऊन बाजारपेठा सजल्या आहेत. अनेक कंपन्यांनी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर नवीन तंत्रज्ञान आणि आकर्षक उत्पादनांची जाहिरातबाजी सुरू केली असून, बाजारात सध्या इलेक्ट्रॉनक्सिच्या वस्तूंचा चांगलाच बोलबाला आहे. यात टीव्ही, फ्रीज, मिक्सर-ग्रार्इंडर, म्युझिक सिस्टीम, स्मार्टफोन, प्ले-स्टेशन, कॉम्प्युटर अशा विविध वस्तूंवर नवनवीन आॅफर आहेत. घरात वस्तू घेण्याबरोबर इलेक्ट्रॉनिक्स वस्तू गिफ्ट देण्याची प्रथाही आता रूजू लागली आहे. बाजारात सध्या सोनी, सॅमसंग, एलजी, गोदरेज, फिलिप्स, पॅनासोनिक आदी कॉर्पोरेट कंपन्यांनी त्यांच्या नवीन प्रोडक्ट सिरीज सोबत दसरा, दिवाळी आॅफर्सही देऊ के ल्या आहेत. पिक्चर क्वालिटी चांगली मिळावी म्हणून बाजारात सध्या फुल एचडी, एलईडी आणि थ्रीडी टिव्हीला चांगलीच मागणी आहे. अत्यंत किफायतशीर किमतींमध्ये फुल एचडी, एलईडी आणि थ्रीडी टिव्हीची मालिका बाजारात उपलब्ध आहे; मात्र नवतंत्रज्ञानाचे चाहते आणि तरुणांच्या पिढीतील ग्राहकांकडूून फोर के टीव्हीला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. मोठ्या आणि महागड्या थ्रीडी टीव्हीवर थ्रीडी इफेक्ट्स पाहण्यासाठी लागणारे थ्रीडी गॉगल्स, प्ले-स्टेशन, वन-टच रिमोट कण्ट्रोल आदी वस्तू मोफत देण्यात येत आहेत. ग्राहकांकडून इलेक्ट्रॉनिक्समध्ये फोर के एलईडी टीव्ही, फुल आॅटोमॅटिक वॉशिंग मशीन आणि फ्रीजला अधिक मागणी आहे.