चाराप्रश्नी उपाययोजनेची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2020 12:22 AM2020-02-24T00:22:11+5:302020-02-24T00:44:49+5:30
उन्हामुळे परिसरात चटके बसू लागले असून जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न उभा राहण्याआधीच शासनाने पर्यायी उपाययोजना करावी अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. मागील वर्षी पावसाळा चांगला झाल्याने विहिरींना पाणी टिकून आहे. त्यामुळे चाºयाची फारशी टंचाई सध्या तरी जाणवत नाही.
खडकी : उन्हामुळे परिसरात चटके बसू लागले असून जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न उभा राहण्याआधीच शासनाने पर्यायी उपाययोजना करावी अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. मागील वर्षी पावसाळा चांगला झाल्याने विहिरींना पाणी टिकून आहे. त्यामुळे चाºयाची फारशी टंचाई सध्या तरी जाणवत नाही.
शेतकºयांनी नवीन उत्पादनाला फाटा देवून हिरव्या चाºयाला पसंती देवून शाळू, मका, खोंडे, घास आदि हिरव्या लागवड केली आहे.
पशुधन पाळण्यासाठी शेतकºयांना विविध योजनांची भुरळ घातली जाते. शासनाकडून योजनांचा पाऊस पाडला जातो; मात्र त्यावर आधारित उद्योगांना चालना देणे गरजेचे आहे. चारा, ढेप, भुसार खाद्य अनुदानातून दिले गेले तरच शेतकरी दूध उत्पादक तारला जाणार
आहे. गतवर्षी चारा व सरकी ढेपीचे भाव गगनाला भिडले होते. ५ हजार रपये दराने खरेदी केलेला उसाचा खुराक देवून जनावरे जिवंत ठेवण्यास मोठी कसरत करावी लागली होती. शासनाने चाराप्रश्न मार्गी लावावा अशी मागणी होत आहे.